शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

...तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही - नारायण भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 05:11 IST

विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे

मुंबई : विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉ. नारायण भोसले यांनी बुधवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात व्याख्यानात व्यक्त केले. इतिहास संशोधन मंडळातर्फे बुधवारी ‘राणीची बाग काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी भोसले बोलत होते. या वेळी इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार उपस्थित होते. मनुष्य स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गाचे अतोनात नुकसान करत आहे, याचे दुष्परिणाम सारे जग अनुभवत आहे. हेच एक दिवस जगाच्या विनाशाचे कारण बनणार आहे. भोसले यांनी मोगल काळापासून देशभरात उभारण्यात आलेल्या बागांविषयीची माहिती दिली. मोगल, ब्रिटिशांनी बागा का आणि कशा उभारल्या याविषयी इत्थंभूत माहिती देताना ते म्हणाले की, ब्रिटिशांचे वास्तव्य भारतात असताना त्यांनी देशाचा सखोल अभ्यास केला. देशाचे हवामान, वन्यजीव, माती, लोकसंख्या, संस्कृती, खाद्यसंस्कृती, आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुरूप देशात वास्तू उभारल्या. त्यात बागांचाही मोठा वाटा होता. (प्रतिनिधी)पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थस्वातंत्र्यानंतर भारताने मात्र देशाचा अभ्यास परिपूर्ण केला नाही त्यामुळेच राणीबागेत परदेशातून आणलेल्या पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थ ठरले. ३५ अंशाहून अधिक तापमान असलेल्या मुंबईत पेंग्विनची योग्य काळजी घेतली असती तर पेंग्विनवर मृत्यू ओढावला नसता, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केली.राणीची ‘बाग’ उत्कृष्ट प्रयोगशाळाराणीची बाग ही केवळ बाग नसून तेथील वनस्पती उद्यान ही एक प्रयोगशाळा आहे. यात ८५३ जातीच्या वनस्पती, २८६ प्रकारचे मोठे वृक्ष आहेत. दररोज ३ हजारांहून अधिक नागरिक राणीबागेला भेट देतात. या वनस्पतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन भोसले यांनी केले.मुंबईची परिस्थिती बिकट जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगभरातील ९० टक्के लोक हे निसर्गाच्या असुंतलनामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांनी त्रस्त आहेत. अहवालानुसार दर एक हजार माणसांमागे तीन एकर जमीन हिरवी असायला हवी तरच मानवी आरोग्य चांगले राहील. मात्र मुंबईत एक हजार माणसांमागे फक्त ०.००३ एवढीच जमीन हिरवी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.