शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस अ‍ॅपवरच्या अफवा फॉरवर्ड करू नका!

By admin | Updated: September 29, 2016 19:28 IST

व्हॉटस अ‍ॅपवरून दहशतवाद अथवा कुठलाही धोका आदी सांगणारे मेसेज फॉरवर्ड करताना सावध रहा.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - व्हॉट्स अ‍ॅपवरून दहशतवाद अथवा कुठलाही धोका आदी सांगणारे मेसेज फॉरवर्ड करताना सावध रहा. सध्याच्या भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये पाकिस्तानी हॅकर्स, सोशल मीडियावरची विकृत तरूणाई, भारतामध्ये अफवा पसरवण्याचं कारस्थान रचू शकतं. त्यामुळेच कुठे दहशतवादी हल्ला झाला, किंवा दहशतवादी दिसले किंवा कुठे स्फोट झाले असे वा तत्सम मेसेज व्हॉट्स अ‍ॅपवर किंवा फेसबुकवर आले तर ते खातरजमा न करता फॉरवर्ड करू नका.

मुंबईलगतच्या उरणमध्ये केवळ थ्रिल अनुभवण्यासाठी एका शाळकरी मुलीने दहशतवादी दिसल्याची अफवा पसरवली आणि जवळपास तीन दिवस सगळ्या परीसरामध्ये भीतीचं साम्राज्य पसरलं आणि तपासयंत्रणांना तीन दिवस हकनाक कामाला जुंपावं लागलं.

सोशल मीडियावर कार्यरत असणारे पाकिस्तानी स्लीपर सेल कदाचित जाणुनबुजून अशा अफवा पसरवण्याची भीती आहे, त्यामुळेच कुठलेही भलते सलते मेसेज आले तरी पॅनिक होऊ नका आणि योग्य प्रसारमाध्यमांमधून अशा बातम्या आल्या नसतील, सरकारी यंत्रणांनी शिक्कामोर्तब केलेलं नसेल तर असे फॉरवर्ड करू नका.