शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमध्ये बिबट्याचे भय संपत नाही!

By admin | Updated: August 26, 2016 02:53 IST

सोनावळे गावात एका बिबट्याला गोळ््या घालून ठार केल्यानंतरही धसई परिसरात बिबट्याची दहशत अद्यापी कायम आहे.

पंकज पाटील,

मुरबाड- सोनावळे गावात एका बिबट्याला गोळ््या घालून ठार केल्यानंतरही धसई परिसरात बिबट्याची दहशत अद्यापी कायम आहे. अद्यापही ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. सोनावळे गावातील काही ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा बिबट्या पाहिल्याचा दावा केल्याने आणि या बिबट्याच्या पायाचे ठसेही दाखविल्याने गावातील वातावरण तंग आहे. ग्रामस्थांच्या या दाव्यावर वन विभागाने मात्र मौन बाळगले आहे. पुन्हा बिबट्या दिसला असेल तर मग बुधवारी मारलेला बिबट्या नरभक्षक होता, की पुन्हा दिसलेला यावरून तर्कर्वितर्कांना उधाण आले आहे. धसई गावाजवळील कळंबाड गावातील एका फार्म हाऊसमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला रेंजमध्ये आणण्यासाठी कुंपणात वासरू बांधून ठेवले होते. बिबट्याने वासराची शिकार करण्यासाठी झेप घेतल्यावर लागलीच वन विभागाच्या बंदुकधारी शूटरने त्याचा वेध घेतला. बिबट्याला ठार केल्याची बातमी काही वेळातच गावभर पसरली. तो मारला गेल्याने ग्रामस्थांमधील दहशत कमी होणे गरजेचे होते. मात्र त्याची दहशत गावात कायम आहे. सोनावळे आणि रामपूर गावातील नागरिक अजूनही हदशतीच्या छायेत आहेत. बिबट्याचा बुधवारी रात्री खातमा झालेला असतांना सोनावळे गावात राहणारे सुभाष लक्ष्मण भोईर यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा गावालगत बिबट्या पहिल्याचा दावा केला आहे. त्याच्यासह इतर ग्रामस्थांनीही त्याला पुष्टी दिली आहे. या संदर्भातील माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. या बिबट्याच्या पायांचे ठसे देखील पुराव्यादाखल देण्यात आले आहे. ग्रामस्थ आपल्या भूूमिकेवर ठाम असले, तरी वन विभाग ते मानण्यास तयार नाही. नरभक्षक बिबट्याचा खातमा केला असून दुसरा बिबट्या नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गावात दुसरा बिबट्या आहे की नाही याबाबत दुमत असले तरी पळू, सोनावळे आणि रामपूर गावातील बिबट्याची दहशत संपुष्टात येण्यासाठी आणखी अवधी लागणार असल्याचे चित्र दिसते. ‘‘बिबट्याला ठार मारले आहे. गावात दुसरा बिबट्या नाही याची खात्री पटण्यास विलंब लागेल. ग्रामस्थांमधील दहशत कमी होत नाही तोपर्यंत गावात बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. तसेच गावात अफवा पसरणार नाहीत, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. - संजय भानुशाली, शिवसेना विभागप्रमुख, धसई.