शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा नको, उपाय शोधा - भय्याजी जोशी

By admin | Updated: December 18, 2015 01:05 IST

आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समस्यांवर केवळ चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी त्यावर उपाय शोधा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी

- योगेश पांडे,  नागपूरआज समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समस्यांवर केवळ चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी त्यावर उपाय शोधा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भाजपाचे आमदार व मंत्र्यांना दिला.विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपाचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. या वेळी जोशी यांनी त्यांचे बौद्धिक घेतले. राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. वेळीच शेतकऱ्यांना सावरण्यात आले नाही, तर शेती संपायला वेळ लागणार नाही, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.शिक्षणाच्या दर्जावर ओढले ताशेरेया वेळी सरकार्यवाह यांनी राज्य शासनाच्या शिक्षण प्रणालीवर ताशेरे ओढले. राज्यात शाळा आहेत. परंतु तेथे दर्जेदार शिक्षण नाही. नववी झालेल्या विद्यार्थ्यांना मूलभूत बाबी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. दक्षिण भारतात गुरुकूल पद्धती चालते. येथून पदवी मिळत नाही. पण ज्ञान नक्कीच मिळते. अशा विविध प्रयोगांवर विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. जातीपातीचे राजकारण नकोआज देशासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राजकारणावर जातीचा पगडा दिसून येतो. जातीपातीचे राजकारण दूर सारून विकासावर भर द्यायला हवा, असे जोशी म्हणाले.