शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरे गायबच!

By admin | Updated: August 27, 2016 01:21 IST

जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची दप्तरे आजही सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची दप्तरे आजही सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार नोटिसा देऊनही ती सापडली नसल्याने अखेर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी शासनाची पंचायत राज कमिटी आली होती. या वेळी या समितीच्या पाहणीत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडे दप्तरच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते. या वेळी समितीने ग्रामपंचायत विभागाला चांगलेच फटकारले होते. ग्रामसेवकांकडून दप्तरे उपलब्ध करून घ्या, नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई केली याची माहिती द्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार ४२ ग्रामपंचायतींकडे दप्तरे उपलब्ध करून द्या म्हणून ग्रामपंचायत विभागाचा पाठपुरावा सुरू होता. तेथील ग्रामसेवकांना वारंवार नोटिसा दिल्या होत्या. जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या सहीनेही नोटीस दिली होती. ४२ पैैकी २९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध करून दिले आहे. १३ ग्रामपंचायतींकडे अद्यापही ते उपलब्ध झाले नाही. त्यातील २ ग्रामसेवक आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. ७ ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यरत असलेल्या चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)>अभिलेखे उपलब्ध नाहीतभोर तालुक्यातील शिरवलीतर्फे भोर या ग्रामपंचायतीचे १९९९ ते २00२ पर्र्यंत दप्तर नाही. तेथील ग्रामसेवक बाळासाहेब गोविंद ढवळे (सध्या जुन्नर)खेड तालुक्यातील करंजविहिरे ग्रामपंचायतीचे १९९५ ते १९९९ चे दप्तर उपलब्ध नाही. त्यामुळे छबीर बाबुलाल आत्तार (सध्या भोर)इंदापूर तालुक्यातील कळाशी ग्रामपंचायतचे १९९८ ते १९९९ पर्यंत दप्तर नाही. त्यामुळे जगदीश भानुदास जमाले (सध्या जुन्नर)खेड तालुक्यातील वांद्रा ग्रामपंचायतीचे १९९७ ते २00४ पर्यंत दप्तर नाही. त्यामुळे भागवत आनंदा नागापुरे (सध्या जुन्नर)>दोन ग्रामसेवकांवर कारवाईबाबत चर्चासेवानिवृत्त सात व आंतरजिल्हा बदलीने गेलेल्या दोन ग्रामसेवकांवर कारवाईबाबत चर्चा सुरू असल्याचे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू यांनी सांगितले.