शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘झीरो बॅलन्स’वर दंड आकारू नका

By admin | Updated: May 12, 2016 04:32 IST

जी बचत खाती ‘शून्य बॅलन्स’ घटकातील आहेत, त्या खात्यात पैसे नसल्याच्या कारणावरून बँकांनी संबंधित खातेदारावर दंड आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

मुंबई : जी बचत खाती ‘शून्य बॅलन्स’ घटकातील आहेत, त्या खात्यात पैसे नसल्याच्या कारणावरून बँकांनी संबंधित खातेदारावर दंड आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. बँकेतील खाती आणि पर्यायाने व्यवहार वाढावेत, याकरिता अनेक सरकारी, खासगी, परदेशी बँका विविध कंपन्यांनी करारबद्ध होत एकगठ्ठा बँकेत तेथील कर्मचाऱ्यांची खाती सुरू करतात. ही खाती सुरू करताना त्यात बँकेतर्फे ज्या सुविधांचे आश्वासन दिले जाते़ त्यातील पहिली सुविधा म्हणून ‘शून्य बॅलन्स’ अशा पद्धतीची ही खाती असतील, असे सांगितले जाते.

याचा अर्थ, या खात्यात एकही पैसा राखला नाही, तर ते खाते सुरू राहील. बहुतांश वेळा कर्मचारी ज्या वेळी एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारतो व नव्या नोकरीत नवे खाते सुरू करतो, त्या वेळी पहिल्या खात्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्यात अपेक्षित बॅलन्स राखला जात नाही. त्यामुळे बँका निगेटिव्ह बॅलन्स दाखवत तेवढी रक्कम ही दंड म्हणून ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात. मात्र, असे पैसे वसूल करणे गैर असून, बँकांनी हे तातडीने थांबवावे, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत, तसेच (प्रतिनिधी)

दंड झाल्याचे ग्राहकांनी बँकांच्या निदर्शनास आणून दिले आणि तरीही जर बँकांनी दाद दिली नाही, तर ग्राहकाने बँकिंग लोकपालाकडे या संदर्भात दाद मागावी, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. कोणत्याही ग्राहकाकडून अशी वसुली होत नसल्याचा दावा बँकांनी केला आहे.