शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी भेटीचा चेंडू कामगार संघटनेच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 05:03 IST

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केलेली १५ हजार रुपये दिवाळी बोनसची मागणी परिवहनमंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अव्यवहार्य

विलास गावंडे / यवतमाळमहाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केलेली १५ हजार रुपये दिवाळी बोनसची मागणी परिवहनमंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अव्यवहार्य ठरविली असून, कामगारांची दिवाळी उत्साहात व्हावी, असे वाटत असेल, तर न्यायालयात दाखल याचिका मागे घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे. बोनसचा प्रश्नही कामगार संघटनेच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. मात्र, कामगारांचे लक्ष महामंडळाच्या निर्णयाकडे लागले आहे.दिवाळी बोनसची मागणी विविध कामगार संघटनांनी लावून धरली आहे. कामगार संघटनेने १५ हजार रुपये बोनसच्या मागणीचे पत्र महामंडळाला दिले आहे. एवढेच नाही, तर १४ आॅक्टोबर रोजी बोनससह विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परिवहनमंत्र्यांनी कामगार संघटनेच्या या पत्राला उत्तर देताना महामंडळाच्या परिस्थितीची आणि संघटनेने कामगारांसाठी काय केले, याची जाणीव करून दिली आहे. महामंडळाचे उत्पन्न घटत असल्याचे माहीत असतानाही १५ हजार रुपये दिवाळी भेट मागणे धारिष्ट्याचे आहे. मागणी पूर्णत: अव्यवहार्य असल्याचे नमूद केले आहे, पण कामगारांची दिवाळी उत्साहात जावी, असे वाटत असेल, तर ‘ती’ याचिका मागे घ्या, असे सुचविण्यात आले आहे. १९९६-२००० च्या करारातील तरतुदीनुसार थकबाकी रकमेतून पाच टक्के रक्कम मान्यताप्राप्त संघटनेकडे वर्ग करण्यात आली होती. प्रती कामगार एक हजार रुपये याप्रमाणे सव्वा लाख कामगारांचे कोट्यवधी रुपये संघटनेकडे जमा झाले आहेत.