शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांचे शहरात स्थलांतर

By admin | Updated: August 29, 2016 05:09 IST

मजुरीचे दर भरमसाट वाढल्याने शहरात बांधकाम तसेच अन्य कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरात अनेक फार्महाऊस असून याठिकाणी कामासाठी मजुरांची गरज भासत आहे

नितीन देशमुख,  पनवेलमजुरीचे दर भरमसाट वाढल्याने शहरात बांधकाम तसेच अन्य कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरात अनेक फार्महाऊस असून याठिकाणी कामासाठी मजुरांची गरज भासत आहे. परिणामी सोलापूरसारख्या दुष्काळग्रस्त भागातून नवी मुंबई, पनवेल परिसरात मजूर आणले जात आहेत. कामाच्या शोधात दुष्काळग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर होत आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण व कर्जत या भागात अनेक फार्महाऊस आहेत. याशिवाय शेतजमीनही मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने भरमसाट मजुरी आकारली जात आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने अनेकांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे सोलापूर, लातूरसारख्या दुष्काळी भागातून कामगार आणले जात आहेत. स्थलांतरित कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास कमी मजुरीत ते कामास तयार होतात. सोलापूरसारख्या भागात चांगली शेती होत नाही, शिवाय उद्योग व्यवसायही फारसे नसल्याने तेथील लोक कामगार म्हणून मुंबईत येण्यास तयार होतात, त्यांना राहण्याच्या आणि जेवणाची व्यवस्था केल्यास ते कमी मजुरीतही काम करण्यास तयार होत असल्याचे एका फार्महाऊस मालकाने सांगितले. फार्महाऊसच्या कामासाठी माणूस पाहिजे म्हणून नवी मुंबई व कोकणात जाहिरात दिली तर कोणी येत नाही. शेतात काम करण्याची मानसिकता येथील लोकांची राहिलेली नाही. सोलापूरला जाहिरात दिल्यास रोज दोन-तीन फोन येतात. त्यांना इथे येण्या-जाण्याचे तिकीट दिल्यास ते लगेच येण्यास तयार होतात. फार्म हाऊसवर काम पसंत पडल्यास राहतात, काही दिवस काम केल्यावर दुसरीकडे निघून जात असल्याचे फार्म हाऊसचे मालक सांगतात.