शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६५१ विक्रमी अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 23:46 IST

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारी

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारीसिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सहाव्या व शेवटच्या दिवशी अनुक्रमे १७९ व ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ उमेदवाराांक्ष नामनिर्देशन दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण दाखल अर्जांची संख्या ६५१ झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी रोजी असून यावेळी किती उमेदवार निवडणूक लढविणार हे निश्चित होणार आहे. इच्छुकांना पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने नेत्यांची आज डोकेदुखी वाढली आहे. २१ फेब्रुवारी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी १२५८ उमेदवारांनी केली होती आॅनलाईन नोंदणी जि. प. व प. स.साठी इच्छुक १२५८ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यात जिल्हा परिषदेसाठी ४८२ तर पंचायत समितीसाठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यात जि. प.साठी ४८२ तर पं. स.साठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र ६५१ उमेदवारांनी ६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत. सोमवारी दाखल झालेले अर्ज सोमवारी वैभववाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २0 अर्ज दाखल झाले. कणकवली तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल झाले. मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४९ अर्ज दाखल झाले. सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६३ अर्ज दाखल झाले. दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १0 तर पंचायत समितीसाठी २६ अर्ज दाखल झाले. देवगड तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २७ अर्ज दाखल झाले. कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ४१ तर पंचायत समितीसाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ५४ अर्ज दाखल झाले आहेत. १३ मे रोजी चित्र स्पष्ट होणार जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली ैआहेत. असे असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १३ फेब्रुवारी आहे. त्यामुळे कीती उमेदवार निवडणूक रिंंगणातून माघार घेणार व किती उमेदवार निवडणूक लढविणार हे चित्र १३ रोजीच स्पष्ट होणार आहे.