शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज

By admin | Updated: September 5, 2016 01:33 IST

बुद्धी देवता, विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन काही तासांवर येऊन ठेपले असताना गणेशाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.

बारामती/पुणे : बुद्धी देवता, विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन काही तासांवर येऊन ठेपले असताना गणेशाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज झाला आहे. सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस आल्याने कुटुंबातील सर्व जण मिळून घरोघरी बाप्पाच्या स्वागताची आणि सजावटीची तयारी मोठ्या उत्साहात करीत होते. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशीच अनेकांनी बाप्पाची मूर्ती घरी आणली, तर काहींनी मूर्तीचे बुकिंग करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशमंडळे आहेत. त्यादृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अंतिम टप्प्यात आलेली गणेश मंडळांचीही कामे रविवारी वेगाने चालू होती. जवळपास सर्वच सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुकीने गणेशोत्सवाचा प्रारंभ केला जातो़ या मिरवणुकीसाठी रथाची सजावट करण्याचे काम सुरू होते़ पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत प्रामुख्याने फुलांची सजावट करताना अनेक ठिकाणी दिसून आले़ मिरवणुकीची परवानगी घेण्यापासून वेगवेगळ्या कामाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्या असून, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी त्यांनी आपापली कामे केली आहेत ना, त्यांना काही अडचणी नाहीत ना, याची चौकशी करून ती कामे करण्यात गुंग होते़ जिल्ह्यातील बंदोबस्ताबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजीराव चिखले यांनी सांगितले की, सणांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच महिला मंडळांचे मेळावे, जातीय सलोखा राखण्यासाठी व्याख्याने आदी उपक्रम पोलिसांच्या वतीने राबविण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात आवाजाची मर्यादा राखण्यासाठी गणेश मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्ह्यात सर्वत्र घेण्यात आल्या. उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या दृष्टीने आजपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील उत्सवाचे पावित्र्य राखावे, याबाबतच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत, असेही चिखले यांनी सांगितले. ग्रामीण पोलिसांचे संख्याबळ साडेतीन हजार इतके आहे. ३०० अधिकारी येथील बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. नव्याने भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना बंदोबस्ताच्या मदतीला घेतले आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मागणविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबरच गृहरक्षक दलाचे १ हजार जवानदेखील बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत. यापूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी १०० पोलीस मित्र करण्यात आले आहेत. त्यांचीदेखील स्वयंसेवक म्हणून मदत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)>किमती वाढल्या : सजावटीच्या वस्तूंना मागणी बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे फुले-हार यांबरोबरच फळे-भाजीपाला, नारळ आणि पूजेचे इतर सामान घेण्यासाठीही नागरिकांची मध्यवस्तीत मोठी गर्दी असल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या सर्व गोष्टींच्या किमतीही वाढल्या होत्या. वाती, रांगोळी, उदबत्ती, धूप, कापूर, वस्त्रमाळा यांसारख्या गोष्टींना विशेष मागणी असल्याचे दिसून आले. सजावटीच्या विविध प्रकारच्या फुलांनाही मोठी मागणी असल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देखावे खुले करण्याची अनेक मंडळांची परंपरा आहे़ त्यादृष्टीने देखाव्यावर अंतिम हात फिरविण्याची लगबग अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुरु होती़ >ढोल-ताशा पथकांची लगबगपुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक हे प्रमुख आकर्षण राहात आले आहे़ गेले दीडदोन महिने सराव केल्यानंतर आता सोमवारी गणेशोत्सवाचा प्रारंभ मिरवणुकीने होत आहे़ इतके दिवस केलेल्या सरावाचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक नागरिकांसमोर करून दाखविण्याची संधी पथकांना पहिल्याच दिवशी मिळणार आहे़ अनेक पथके एकाच वेळी वेगवेगळ्या मंडळांच्या पुढे आपले सादरीकरण करणार आहेत़ त्यादृष्टीने कोणता संघ कोणत्या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होईल़, त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळवी करण्याची लगबग पथकामध्ये दिसून येत होती़