शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सदस्यांची अंगझडती - दीड लाखांची अपसंपदा सापडली

By admin | Updated: October 5, 2014 01:13 IST

येथील जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला. सदस्यांजवळून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.

भाजपा सदस्यांचा समावेश : सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान घडला प्रकारचंद्रपूर : येथील जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला. सदस्यांजवळून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, अध्यक्षासह नवनियुक्त सभापती आणि सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेत त्यांना तब्बल पाच तासपर्यंत अडवून ठेवले. भाजपाच्या अलका आत्राम महिला सदस्याजवळ एक लाख रुपये आढळून आल्याने वर्तवितर्क व्यक्त केले जात आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सदस्यांची चौकशी सुरु होती. जिल्हा परिषद सभापतींची निवडणूक शनिवारी होती. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच सदस्यांजवळ मोठ्या रक्कम असल्याचा निनावी फोन पोलिसांना आला. ही माहिती मिळताच रामनगर पोलिसांच्या पथकासह निवडणूक निगरानी पथकाच्या सदस्यांनी जिल्हा परिषद गाठली. सभागृहात बसलेल्या सर्व सदस्यांना बाहेर बोलावून सर्वांची अंगझडती घेण्यात आली. यात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्यासद नवनियुक्त सभापती आणि सदस्यांचा समावेश होता. यामध्ये भाजपाच्या पाच महिला सदस्यांजवळ रक्कम आढळून आली. यातील अलका आत्राम यांच्याजवळ एक लाख रुपये, वैशाली कुकडे यांच्याजवळ २२ हजार, वर्षा सुरपाम ५ हजार, नीता पेंदाम १७ हजार रुपये आढळून आले. जप्त करण्यात आलेली १ लाख ४९ हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषद सदस्यांजवळ कोणत्या मार्गाने आली, याबाबत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. या प्रकरणात कोणती कारवाई करायची याबद्दल पोलीस पथक आणि निवडणूक विशेष निगराणी पथक संभ्रमात होते. पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडून मत मागविले जात असल्याने बराच वेळ सदस्यांना अडवून ठेवण्यात आले होते.दरम्यान, पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी अडवून ठेवल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष गुरुनुले आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काही सदस्यांनी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही पोलिसांनी जिल्हा परिषद कक्षामध्ये आणले. पोलिसांनी जप्त केलेली रक्कम निवडणूक निगरानी पथकाकडे सुपूर्द केली. रात्री ८.३० वाजतानंतर नवनियुक्त सभापती देवराव भोंगळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर बोलावू तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या अटीवर सर्वांना जाण्यास परवानगी देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)