शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बालकाचा छिन्न-विच्छिन्न मृतदेह

By admin | Updated: March 6, 2017 02:04 IST

बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथे एक मृत नवजात बालक आढळून आले

शिरूर : बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथे एक मृत नवजात बालक आढळून आले. या बालकाच्या शरीराचा बहुतांश भाग कुत्र्याने खाल्ल्याने बालक स्त्री किंवा पुरुष जातीचे आहे, हे ओळखणे अवघड झाले. हे नवजात बालक स्त्री जातीचे असावे, अशी चर्चा परिसरात रंगली होती. पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.२६ फेब्रुवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास बाभुळसर येथे उत्तम भिकाजी भालेराव यांच्या दारात सदर नवजात बालक आढळून आले. कुत्र्याने ओढून त्यांच्या दारात टाकले. बालकाच्या शरीराचा बराचसा भाग कुत्र्याने खाल्ल्याचे आढळून आले. भालेराव यांनी पोलिसांत खबर दिल्यावर पोलिसांनी पंचनामा केला.नवजात बालकाला नक्की कुठे फेकले, कोणी फेकले याची काहीही माहिती नसल्याने अज्ञात व्यक्तीने जन्माची लपवणूक करून विल्हेवाट लावण्याच्या हेतूने अज्ञात ठिकाणी त्यास टाकून दिले, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली.‘लोकमत’ने तालुक्यातील एकूणच गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्येविषयी मालिका प्रसिद्ध केल्यावर शहर व तालुक्यातील अनेक सोनोग्राफी सेंटर्स व गर्भपात केंद्रे बंद करण्यात आली होती. बाभुळसर येथे सापडलेले बालक हे स्त्री जातीचेच असावे असा कयास आहे. ते कळू नये म्हणून त्याला कुत्र्याच्या हवाली केले, जेणेकरून स्त्री जातीचे हे बालक होते समजू नये, अशीही चर्चा रंगली. शिरूरसारख्या (याबाबत) बदनाम तालुक्यात हे घडू शकते याची जणू लोकांना खात्री आहे. पोलिसांपुढे आता याचा तपास लावण्याचे आव्हान आहे. पोलिसांनी प्रामाणिकपणे याचा तपास केल्यास याचा छडा लागू शकेल. (वार्ताहर)नवजात बालक अशा पद्धतीने आढळल्याने उलटसुलट चर्चा सुरु होती. स्त्री जातीचे बालक असल्याने या बालकास फेकले असावे, अशी चर्चा रंगली होती. गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या याबाबत तसेही शिरूर तालुक्याचे नाव बदनाम आहे.काही वर्षांपूर्वी घोड नदीत शनीमंदिराजवळ दोन बालके मृतावस्थेत आढळली होती. याबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडली असता संबंधित एका डॉक्टरवर गर्भलिंगनिदान केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता.