शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘डिस्कव्हरी’चा तोतया संचालक अटकेत

By admin | Updated: April 4, 2015 04:51 IST

डिस्कव्हरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याचे सांगून जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणाऱ्यांना फसविणाऱ्या महाठगाला

मुंबई : डिस्कव्हरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याचे सांगून जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणाऱ्यांना फसविणाऱ्या महाठगाला मनाली येथून अटक केली आहे. मूळचा गुजरातचा असलेल्या मिलिंद भरतकुमार भट (२७) या आरोपीविरोधात मुंबईसह, दिल्ली, गोवा, चेन्नई या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सायन पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा ठग पोलिसांच्या हाती सापडला.डिस्कव्हरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर बनून फिरणाऱ्या भटने इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईसह दिल्ली, चेन्नई आणि गोव्यामध्ये भाडेतत्त्वावर कॅमेरे देणाऱ्यांचे पत्ते मिळवले. गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारे डिस्कव्हरी चॅनलसाठी जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भटने १४ डिसेंबरला एका खासगी वृत्तवाहिनीसह, बोरीवलीतील एका व्यक्तीकडून तब्बल २१ लाख किमतीचे कॅमेरे भाडेतत्त्वावर घेऊन विकले. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला भटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मूळचा गुजरातच्या कच्छमधील रहिवासी असलेला भट हा कुटुंबासह विलेपार्ले येथे राहण्यास होता. मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या ठगाने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. पत्नीला घेऊन वेगळे राहण्याच्या हट्टापोटी कुंची कुर्वे टोळीकडून १० लाख रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी भटने पहिल्यांदा भाडेतत्त्वावर कॅमेरे घेऊन एका जाहिरात कंपनीचे काम मिळवले. मात्र ते वेळेत पूर्ण न झाल्याने भाड्याचे कर्ज त्याच्या डोक्यावर झाले. हे कर्ज फेडण्यासाठी भटने हे कॅमेरे विकून पळ काढला. मात्र त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार न झाल्याने त्याने पैसे कमविण्यासाठी हाच अवैध व्यवसाय सुरू केला. १० हजार रुपयांपासून २५ हजार रुपये महिना भाडेतत्त्वावर हा ठग कॅमेरे घेत होता. (प्रतिनिधी)