शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नागो गाणारांच्या उमेदवारीविरोधात असंतोष

By admin | Updated: September 2, 2016 01:48 IST

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या असून यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यात

नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या असून यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यात आल्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत असंतोष निर्माण झाला आहे. नागपूर विभागीय अध्यक्षांसमवेत कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी राजीनामे दिले आहे. शनिवारी पुण्यात होणाऱ्या परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत गाणारांना उमेदवारी दिल्याच्या निर्णयाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार हा प्रस्ताव फेटाळण्यात आला तरी, असंतुष्ट सदस्यांकडून नवा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी शेषराव बीजवार यांचे नाव चर्चेत आहे. चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक विद्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत नागपूर विभागीय सदस्यांनी याचे संकेत दिले होते. या बैठकीत सर्वांनी राजीनामे दिले. गाणार यांची कार्यकर्त्यांसोबतची वागणूक, अपशब्दांचा वापर व निष्ठावान कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सदस्यांमध्ये त्यांच्याविरोधात असंतोष आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाणार यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. सोबतच त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय नियमबाह्य व संघटनेच्या घटनेच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे.नागो गाणार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मे महिन्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला होता. राज्य कार्यकारिणीला हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाददेखील केला होता. कार्यकारिणीचा कार्यकाळ जानेवारी २०१५मध्ये संपुष्टात आला होता. नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी तत्काळ निवडणुका व्हायला हव्या होत्या. परंतु असे न करता कार्यकारिणीने निवडणुका सहा महिन्यांसाठी स्थगित केल्या. गाणार यांची उमेदवारी कायम राहावी, हा यामागचा उद्देश होता. (प्रतिनिधी)