शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

अग्निशमन दलाच्या १६ जवानांना डिस्चार्ज

By admin | Updated: July 21, 2014 03:29 IST

लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या एकूण २० जखमी जवानांपैकी कमी प्रमाणात जखमी झालेल्या

मुंबई : लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या एकूण २० जखमी जवानांपैकी कमी प्रमाणात जखमी झालेल्या १६ जवान, अधिकाऱ्यांना डिस्चार्ज दिल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीताराम गावडे यांनी दिली. शुक्रवारी आग विझवताना जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना, अधिकाऱ्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात केले होते. खरे पाहता यांना रुग्णालयातील बर्न वॉर्डमध्ये दाखल केले पाहिजे होते, मात्र यांना मेल सर्जरी वॉर्डमध्ये दाखल केले. २० जवानांना कूपर रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले होते. १६ जणांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा होत्या. यामुळे त्यांना याच रुग्णालयात उपचार दिले, तर जास्त प्रमाणात भाजलेल्या ४ जणांना येथे बर्न वार्ड नसल्याने ऐरोलीच्या बर्न सेंटरमध्ये हलवले होते. १६ जणांची रविवारी तपासणी केली. यामध्ये सर्व जणांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रविवारीच डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे डॉ. गावडे यांनी सांगितले. भाजलेल्या व्यक्तींना सर्जरी वॉर्डमध्ये का दाखल केले, यावर गावडे यांनी सांगितले की, भाजलेल्या व्यक्तींना देखील इतर उपचार करायचे असतील तर सर्जरी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. या १६ जणांवर इतर उपचारही करायचे होते, म्हणूनच त्यांना सर्जरी वॉर्डमध्ये दाखल केले.