बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि बनावट फोन कॉल्सचीआपत्ती काळातही प्रशासन अनूभवावी लागतेय विकृत मानसिकता- जयंत धुळप
अलिबाग, दि. ५ : कोणतीही आपत्ती आली, मानवी हानी झाली की सवर्साधारणपणे संवेदनशिलता वृद्धींगत होते, परंतू आपत्ती नियंत्रण व मदत यंत्रणेच्या कामात बाधा आणून त्यांतून असूरी आनंद मिळवण्याच्या एका विकृत मानसिकतेचा अनूभव ,महाड पूल दुर्घटनेअंती रायगड जिल्हा आपत्ती निवारण व मदत यंत्रणेस येत आहे.मी सावित्री नदिच्या बाजूच्या एका झाडावर चढून बसलो आहे. मला एनडीआरएफचे जवान दिसत आहेत. परंतू त्यांना मी दिसत नाही. मला वाचवा. त्यांना मला वाचवायला सांगा....असा फोन एका मोबाईल वरुन रायगड जिल्हा आपत्ती निवारण व मदत कक्षाच्या फोनवर आला. गुरुवारी सकाळी आला आणि तेथे उपस्थित रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी सतिष बागल यांनी तत्काळ महाड येथे कार्यरत बचाव पथकास या बाबतची माहिती दिली. फोन करणारे ते आपदग्रस्त नेमके कोणत्या ठिकाणी आहेत हे शोधून काढून त्यांना वाचवण्य़ाचे प्रयत्न तत्काळ व्हावेत या हेतूने बागल यांनी मोबाईल लोकशन डिटेक्टर द्वारे त्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता , तो मोबाईल फोन खालापूर जवळ असल्याचे निष्पन्न झाले.
परिणामी त्यांनी त्या मोबाईल धारकास फोन केला व या बाबत विचारणा केली असता, तो उत्तरे देण्यास गांगरुन गेला आणि त्यांने तत्काळ आपला मोबाईल बंद करुन टाकला. परंत संपर्क साधला असता तो मोबाईल स्विच्डआॅफ येत आहे. परिणामी हा बनावट फोन होता असे स्पष्ट झाले. या प्रकरणी त्या मोबाईल धारकास शोधून , आपत्ती मदत कार्यात व्यत्यय आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश बागल यांनी खालापूर व पनवेल येथील तहसिलदारांना दिले असल्याची माहिती बागल यांनी लोकमत शी बोलताना दिली.व्हॉट्सअॅवरुन महाड घटनेशी संबंधीत नसले फोटो पोस्ट करुन शोध यंत्रणा व जनसामान्य यांच्या मध्ये गोधळ निर्माण करुन त्यांतून विकृत आनंद मिळवण्याची मानसिकता देखील अनूभवास येत आहे. महाड आपत्तीअंती दुसऱ्या दिवशी शोध कार्य सुुरु झाल्यावर महाडच्या घटनेशी संबध नसलेल्या अन्यत्रच्या दोन मृतदेहांचे फोटो व्हॉट्सअॅपवर पोस्ट करुन मोठा गोधळ निर्माण करण्यात आला होता. तर शुक्रवारी सकाळी महाडच्या घटनेशी संबंध नसलेल्या अन्यत्रच्या अपघातग्रस्त दोन एसटी बसेसचे फोटो व्हॉट्सअॅपवर पोस्ट करुन सावित्री नदितील एसटी बसेस काढण्यात यश अशी खोटी पोस्ट टाकण्यात आल्याने संभ्रम निर्माण करण्यात आला होता.आपत्ती निवारण यंत्रणा आणि मदत यंत्रणा यांना स्वेच्छेने अनन्यसाधारण मदत आणि सहकार्य करणारी माणसे , कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था महाड मध्ये कार्यरत असतानाच, अशा प्रकारे त्या मदत यंत्रणेत खो घालून संभ्रम निर्माण करुन व्यत्यय आणण्याची मानसिका अत्यंत गंभीर स्वरुपाची असून त्याबाबतही पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कारवाईची प्रक्रीया करण्यात येत आहे. कायदेशीर कारवाई पेक्षा मानवी संवेदनशिलता जागृक ठेवून अशा प्रकारच्या चूकीच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हॉटस्अॅप व अन्य सोशल मीडीया माध्यमांतून प्रसिद्ध होणार नाहीत, प्रसिद्ध झाल्याच तर फॉर्वर्ड होणार नाहीत, याची सामाजिक बांधीलकीतून दक्षता घेवून आपत्ती निवारण व मदत यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन बागल यांनी अखेरीस केले आहे.