शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या प्रभागात भाजी मंडईमुळे गैरसोय

By admin | Updated: July 20, 2016 01:49 IST

विविध विकासकामे केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले, तरी गणेशनगर प्रभागातील भाजी मंडईचा प्रश्न अद्याप कायम आहे.

पिंपरी : विविध विकासकामे केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले, तरी गणेशनगर प्रभागातील भाजी मंडईचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे भर चौकातच भाजी मंडई भरत असून, यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याची स्थिती गणेशनगर प्रभागात पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील गणेशनगर या ५१ क्रमांकाच्या प्रभागाचे प्रतिनिधित्व श्रीरंग बारणे आणि माया बारणे हे करतात. सुमारे २२ हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या प्रभागात बेलठिकानगर, गणेशनगर, लक्ष्मणनगर, गुजरवस्ती, डांगै चौक, सोळा नंबर बस स्टॉप आदी भाग येतो. या प्रभागामध्ये दाट लोकवस्तीचा परिसर अधिक आहे. यासह डांगे चौकासारखा महत्त्वाचा भागही याच प्रभागात येतो. या चौकातून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. किवळे ते औंध हा बीआरटीएस मार्ग डांगे चौकातूनच जातो. मात्र, या चौकात असलेले भाजीविक्रेते तसेच इतर विक्रेत्यांमुळे चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे जलद प्रवासी वाहतुकीसाठी असलेली बीआरटीएस सेवा या चौकात अडखळते. यासह इतर वाहनांनाही गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागते. येथील अतिक्रमणांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रभागातील मुख्य रस्ते अतिक्रमणांमुळे गायब झाले आहेत. बीआरटीएस मार्गिका झाल्यानंतर हा रस्ता प्रशस्त झाला. मात्र, रस्त्यावरच दुकाने थाटल्याने प्रशस्त रस्ता होऊनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. यामुळे प्रभागातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न जटिल बनला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांचा वाहनचालकांसह नागरिकांनाही रोजच सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून भेडसावत असलेला हा अतिक्रमणांचा प्रश्न कधी सुटणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. (वार्ताहर)