शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहातील सुविधा कलावंतांसाठी अपुऱ्या

By admin | Updated: August 4, 2015 00:57 IST

सांस्कृतिक संचनालनातर्फे राज्यातील सुमारे १२५ नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, कलावंतांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या असल्याचा निष्कर्ष

पुणे : सांस्कृतिक संचनालनातर्फे राज्यातील सुमारे १२५ नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, कलावंतांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. समितीने संबंधित अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. अहवालात नोंदवण्यात आलेल्या नाट्यगृहातील त्रुटींची दखल घेऊन राज्य सरकार त्यानुसार सुधारण करणार आहे.सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच यासंदर्भात बैठक होणार आहे. राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या माहितीसाठी एक संकेतस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक संचालक अजय अंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नाट्यगृहांची स्थिती, वास्तुरचनेच्या दृष्टिकोनातून असलेल्या उणिवा, सभागृहांचेच नाट्यगृहामध्ये करण्यात आलेले रूपांतर या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी शासनाने राज्यातील नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाची मोहीम पाच महिन्यांपूर्वी हाती घेतली होती. त्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसह राज्यातील तब्बल १२५ नाट्यगृहांची पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाविषयी बोलताना शासनाचे मुख्य समन्वयक नाबिद इनामदार म्हणाले, नाट्यगृह तर प्रेक्षकांनी भरतात मात्र कलावंतांना रंगमंच अपुरा पडतो. एकाच ठिकाणी दोन नाटकांचे प्रयोग असल्यास एखाद्या संस्थेला मेकअप रूमच उपलब्ध होत नाही. अग्निशमन रोधक यंत्रणा नाही, चांगल्या ध्वनी-प्रकाश योजनेचा अभाव अशा अनेक उणिवा आहेत. नाट्यगृहांमध्ये अधिक सुविधा कशा देता येतील, त्यांचे तिकीट दर काय असावेत याबाबत अहवालात काही सूचना करण्यात आल्या असल्याचे इनामदार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)