शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी बाजारतळावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 21, 2016 01:16 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे. तेथे व्यापारी व बाजारकरूंसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बाजारतळात आधुनिक सोयीसुविधांची अपेक्षा आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने कुलदैवत खंडोबाचा रविवार हा वार असल्याने दर रविवारी देवदर्शनासाठी राज्यभरातूनच नव्हे तर जेजुरी परिसरातील खेड्यातून भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर या अनास्थेवर टकालेला प्रकाश.रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस होता. दर रविवारी येथे आठवडे बाजार भरत होता. आता मात्र जेजुरीत रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने गेल्या वर्षीपासून जेजुरी नगरपालिकेने रविवारऐवजी गुरुवारचा आठवडे बाजार केला आहे. शहरातील मध्यवस्तीतील सुमारे एक एकर क्षेत्रावर हा बाजार भरतो. आज ती जागाही कमी पडू लागली आहे. बाजूलाच जिल्हा परिषदेची सुमारे दोन एकर मोकळी जागा आहे. त्या जागेत ही बाजार भरू लागला आहे. बाजाराला जागा कमी पडत असल्याने पालिकेने जिल्हा परिषदेच्या या जागेवरच नवीन विकास आराखड्यात आरक्षण टाकून आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)>वर्षाला १६ लाख रुपयांचे उत्पन्नपालिकेने बाजारतळाची जागा मोठी करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला असला तरीही येथे बाजारकरूंना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे मात्र दुर्लक्षच केलेले आहे. या बाजारतळातून पालिकेला बाजारकरापोटी वर्षाला सुमारे १६ लाख रुपयांचे मोठे उत्पन्न मिळते. मात्र त्या बदल्यात सुविधा दिल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परिसरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पालिकेने बांधलेल्या ओट्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.पावासाळळ्यामध्ये बाजार करताना शेडची सुविधा उपलब्ध नाही.४तुटक्या ओट्यावरच माल मांडून विकावा लागतो. बाजारात येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही की स्वछतागृहही नाही. जे आहे त्याची ही मोठी दुरवस्था असल्याने त्याचा वापरही कोणी करत नाही. बाजारात प्रवेश करण्यासाठी अरुंद रस्ते असल्याने बाजाराची वाहने तळाकडे नेणे मोठे जिकिरीचे झालेले आहे. मोकळे पटांगण असूनही लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. येथे मोठे व विस्तीर्ण पटांगण असूनही योग्य नियोजन आणि सुविधा नसल्याने बाजारकरूंचे मोठे हाल होत आहेत. याकडे पालिकेने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाजारातील व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. आमच्याकडून बाजारकर वसूल केला जातो. त्याच्या बदल्यात आम्हाला सुविधा मात्र मिळत नसल्याच्याच तक्रारी नागरिकांनी आहेत.