शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ संचालक सीबीआयच्या जाळ्यात

By admin | Updated: August 1, 2016 04:13 IST

५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दहा हजार रुपये घेताना चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण संचालक अलोक वार्ष्णेय यास शनिवारी सीबीआयने रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : मुंबईस्थित एका ठेकेदारास कंत्राट देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दहा हजार रुपये घेताना चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण संचालक अलोक वार्ष्णेय यास शनिवारी सीबीआयने रंगेहाथ पकडले. त्याला रविवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ आॅगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावली. याविषयी सीबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिकलठाणा विमानतळावर नियमित फ्लाईटशिवाय अन्य विमानेही ये-जा करतात. या विमानांना विमानतळावर खासगी सेवा देण्यासाठी कंत्राट मिळावे, यासाठी मालाड (मुंबई) येथील एका कंपनीने विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. शिवाय नॉन-शेड्युल्ड विमानांना सेवा देण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना विमानतळावर येण्या-जाण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंतीही केली होती. हे कंत्राट देण्यासाठी अलोक वार्ष्णेय याने या कंपनीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर, प्रती विमान विशिष्ट रक्कम द्यावी लागेल, असेही या कंपनीला सांगितले होते. याबाबत कंपनीने सीबीआयकडे तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)>वार्ष्णेय याची विविध राज्यांत संपत्तीवार्ष्णेय याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने एकाच वेळी चिकलठाणा विमानतळावरील त्याचे कार्यालय आणि निवासस्थानाची झडती घेतली. त्याचे उत्तर प्रदेशातील वाराणसी तसेच नोएडा आणि हरियाणा राज्यातील गुडगाव येथे घर आहे. या घरांचीही सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने झाडाझडती घेतली. शिवाय त्यांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. याबाबतची महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत.