शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात धिंगाणा

By admin | Updated: June 17, 2016 02:24 IST

मदतीसाठी गेलेल्या पोलिसांनाच शिविगाळ करत मारहाण झाल्याची घटना वरळीत घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी सहा पोलिसांसोबत असभ्य वर्तन करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना

मुंबई : मदतीसाठी गेलेल्या पोलिसांनाच शिविगाळ करत मारहाण झाल्याची घटना वरळीत घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी सहा पोलिसांसोबत असभ्य वर्तन करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यात समावेश असलेल्या २० वर्षीय तरुणीने दारुच्या नशेत सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला मारहाण केली.गौरी भिडे (२०), चिराग बोहरा (२१), कपील राठोड (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका १७ वर्षीय मुलाचाही समावेश असून चौघही चेंबुर येथील रहिवासी आहे. चौघेही विद्यार्थी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गौरी आपल्या वडीलांच्या वर्ना कारने चिराग, कपील आणि अल्पवयीन मुलासह नाईट आऊटसाठी बाहेर पडली. चौघेही दारुच्या नशेत होते. चौघेही वरळी सी-फेसच्या दिशेने निघाले. दरम्यान तिचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी पोद्दार रुग्णालयाजवळील डिव्हायडरला धडकून फुटपाथवर चढली. गाडीचा अपघात झाल्याचे पाहून स्थानिकांनी गर्दी करत तिच्या बचावासाठी पुढाकार घेतला. मात्र गौरीने त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तेथून जात असलेल्या पोलिसांच्या महिला दक्षता व्हॅनचे अपघाताकडे लक्ष गेले. यावेळी गाडीमध्ये ५५ वर्षीय एएसआय पाटील यांच्यासह तीन महिला हवालदार होत्या. पाटील यांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असता, गौरीने थेट त्यांनाच मारहाण करीत चावाही घेतला. ते पाहून इतर महिलांनी त्याकडे धाव घेतली. तेव्हा तिच्या मित्रांनी त्या पोलिसांनाच शिविगाळ करण्यास सुरुवात केली. आणखी पोलीस कुमक मागवून चौघांनाही वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हाही चौघांचा धिंगाणा सुरु होता. तेथे असलेल्या पोलिसांनाही गौरी आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तेथील सीसीटीव्हीचा सॉकेट ओढून त्यांचेही नुकसान केले. पोलीस ठाण्यातील संगणकही खाली पाडला. चौघांनाही सरकारी कामात अडथळा निर्माण करुन पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)- गौरी भिडे हिला ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय कुलकर्णी यांनी दिली.