शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्थानकांत डिजिटल डिस्प्ले

By admin | Updated: September 15, 2014 04:22 IST

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी सेवेत काही आधुनिक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून महामंडळाकडून एसटीचे संगणकीकरण येत्या काही वर्षांत केले जाणार

मुंबई : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी सेवेत काही आधुनिक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून महामंडळाकडून एसटीचे संगणकीकरण येत्या काही वर्षांत केले जाणार आहे. या संगणकीकरणांतर्गत प्रामुख्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्थानक आणि आगारात एसटी बसच्या आगमन आणि निर्गमनाची वेळ दर्शविणारे ‘इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड’ बसवण्यात येणार असून, एसटी बसला स्थानक किंवा आगारात येण्यास लागणारा कालावधीही दर्शविला जाणार आहे. एसटी महामंडळाचे प्रवासी घटत असून, अनेक खर्चांमुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. तरीही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे महामंडळ प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्यावर भर देत आहे. राज्यात मोठा पसारा असलेल्या एसटी महामंडळाने आता पूर्णत: संगणकीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे राज्यभर संगणकीकरणाची योजना महामंडळाने आखली असून, त्याअंतर्गत महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी सोयीसुविधा आणतानाच प्रवासी सेवांवरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने एसटी महामंडळ हे संगणकीकरण करणार आहे. यासाठी ४९३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात १८७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या या योजनेत आणखी काही समाविष्ट करता येते का याची चाचपणी सुरू असून, त्यानंतर महामंडळ अखेरचा अहवाल तयार करून राज्य सरकारमार्फत तो रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे. या संगणकीकरणासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय आणि एसटी महामंडळ हा निधी उभा करणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.राज्यातील एसटीचा कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न यात असेल. तसेच एसटीचे आॅनलाइन आरक्षणही यातून सुधारले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानक किंवा आगारात एसटी गाड्यांच्या आगमन आणि निर्गमनाची वेळ दर्शविणारे इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसवण्यात येणार आहेत. यात एसटीला इच्छित स्थळी जाण्यासाठी लागणारा वेळ, ठिकाण आदी बाबी दर्शविल्या जाणार आहेत. साधारण पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एसटीचे पूर्णत: संगणकीकरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)