शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दिघी आर्मी स्कूल, अजमेरा अंतिम फेरीत

By admin | Updated: August 2, 2016 01:55 IST

सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूल आणि मोरवाडी येथील एसएस अजमेरा स्कूलने अंतिम फेरीत प्रवेश केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूल आणि मोरवाडी येथील एसएस अजमेरा स्कूलने अंतिम फेरीत प्रवेश केला.मासूळकर कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलात स्पर्धा सुरू आहे. सोमवारी पहिल्या उपांत्य लढतीत दिघीच्या आर्मी पब्लिक स्कूलने देहूरोडच्या आर्मी स्कूलचा टायब्रेकरमध्ये ४-३ असा पराभव केला. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली होती. टायब्रेकरमध्ये दिघीकडून दिनेश सिंग, फहिम खान, प्रतीक चांदे आणि सुमित कांबळे यांनी गोल केले. देहूरोडकडून मृण्मय हिरकणे, आजस कटापूरकर आणि आर्यन सलग्रोता यांना गोल करण्यात यश मिळाले. पहिला उपांत्य सामना रंगतदार झाला. मात्र, तुलनेने दुसऱ्या उपांत्य सामन्यात फारसा आक्रमक खेळ दिसला नाही. एसएस अजमेराने निगडीच्या अमृता विद्यालयम्चा १-० असा निसटता पराभव केला. त्यांच्या साहिल आगाने विजयी गोल नोंदविला.१७ वर्षांखालील गटात पिंपरीच्या जीजी इंटरनॅशनल स्कूलने आकुर्डीच्या सरस्वती विश्व विद्यालयावर देवांश सिरोहीच्या गोलाच्या बळावर १-०ने मात केली. भोसरीच्या प्रियदर्शनी स्कूलने निगडीच्या क्रिएटिव्ह स्कूलला १-० असेच नमविले. त्यांचा विजयी गोल आकाश सावंतने केला. न्यू मिलेनियमने अभिषेक विद्यालयावर गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ४-२ अशी सरशी साधली. त्यांच्या प्रसाद कुणाल, वैशव शिंदे, आदित्य रहातवान य स्टॅलोन नायगम यांनी गोल केले. अभिषेक विद्यालयाकडून रोहन पाटील आणि चेतन शाही यांना गोल करण्यात यश मिळाले. (प्रतिनिधी)>१७ वर्षांखालील गटात निगडीच्या अभिमान इंग्लिश स्कूलने एसएस अजमेरा, चिंचवडचा १-० असा पराभव केला. एकमेव गोल साहिल दळवीने केला. चिंचवडच्या सेंट अ‍ॅण्ड्र्यूजने देहूरोडच्या सेंट ज्यूडचा टायब्रेकरमध्ये ४-२ असा पराभव केला. गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये सेंट अ‍ॅण्ड्र्यूजकडून रोहित शर्मा, अनिष वाघमारे, आशुतोष जोरखडे, रोनाल्ड जॉन यांनी आणि सेंट ज्यूडकडून रिहान मणियार व महेश परोदलू यांनी गोल केले.