शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कमी पैसेवारी असलेल्या गावांना विविध सवलती

By admin | Updated: July 6, 2014 23:27 IST

राज्यातील ४८४ गावांना मिळणार लाभ

अकोला : ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणार्‍या गावांना विविध सवलती देण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ४८४ गावांना मिळणार असून, या माध्यमातून गावांच्या विकासाला हातभार लागणार आहे. टंचाईसदृश परिस्थिती असलेल्या गावांनादेखील याद्वारे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी राज्याच्या काही भागात अतवृष्टी झाली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले. त्यानंतर शासनाने रब्बी हंगामासाठी शेती उत्पादनावर आधारित पैसेवारी जाहीर केली. २0१३-१४ या वर्षातील रब्बी पिकांच्या अंतिम पैसेवारीचा गोषवारा शासनाने जाहीर केला. यामध्ये ३ हजार ८२६ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यापैकी ४८४ गावांमध्ये ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी, तर ३ हजार ३८२ गावांमध्ये ५0 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असल्याचे जाहीर करण्यात आले. ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली सर्वाधिक ३५५ गावे अहमदनगर जिल्ह्यात आहेत. सर्वात कमी गावे म्हणजे फक्त एक गाव भंडारा जिल्ह्यात आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात ८८, नागपूर जिल्ह्यात १४, तर चंद्रपूर जिल्ह्यात २६ गावे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी आहेत. ५0 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असणारी सर्वाधिक १ हजार ५६ गावे सोलापूर जिल्ह्यात तर सर्वात कमी ९ गावे भंडारा जिल्ह्यात आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यात ५४२, सातारा जिल्ह्यात १९२, सांगली जिल्ह्यात १0४, अहमदनगर जिल्ह्यात ६६३, उस्मानाबाद जिल्ह्यात ३३३, चंद्रपूर जिल्ह्यात ३६६ गावे आणि गडचिरोली जिल्ह्यात ११७ गावे आहेत. ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणार्‍या गावांना शासन विविध सवलती देणार आहेत. गावांची पैसेवारी ठरविण्यासाठी शासनाने गतवर्षी समिती स्थापन केली होती. सलग दहा वर्षात सर्वाधिक उत्पन असलेल्या तीन वर्षांंची सरासरी काढून, त्याआधारे गावाची पैसेवारी काढण्याची पद्धती रुढ आहे. यात अचुकता आणण्यासाठी शासनाने गतवर्षी समिती स्थापन केली होती; परंतु प्रत्येक जिल्ह्यात जमिनीचा पोत वेगळा, पिकांचे प्रकार वेगळे, पिकांवरील रोग वेगळे असल्याने समितीकडून उपयुक्त काम झाले नाही. या समितीचे नंतर काय झाले, हे समोर आले नाही. याच उद्देशाने शासनाने यापूर्वीही तीन समित्या स्थापन केल्या होत्या; परंतु त्यांचाही उपयोग झाला नाही.