शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विदर्भात मतभिन्नता!

By admin | Updated: May 29, 2016 02:09 IST

सिंचनासाठी कालव्यांऐवजी पाइपने पाणी देण्याचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या काही प्रमाणात योग्य वाटत असला तरी तो पूर्णत: सक्षम नाही, असा एक मतप्रवाह आहे. एखाद्याच्या शेतातून

- नंदू परसावार,  भंडारा

सिंचनासाठी कालव्यांऐवजी पाइपने पाणी देण्याचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या काही प्रमाणात योग्य वाटत असला तरी तो पूर्णत: सक्षम नाही, असा एक मतप्रवाह आहे. एखाद्याच्या शेतातून पाइपलाइन टाकताना संबंधित शेतकऱ्याने परवानगी नाकारली तर अडचणींना सामोरे जावे लागेल, असा दुसरा मतप्रवाह आहे. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द हा राष्ट्रीय तर बावनथडी हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. त्यापैकी गोसेखुदची क्षमता १,१४६.०६ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली येथे पाणी जाते. कालव्यातून पाइपलाइन टाकणे, असा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पाइपलाइनच्या निर्वहनक्षमतेला कालमर्यादा असल्यामुळे पाइपलाइन कालांतराने जीर्ण होते. भंडारा शहरातील पाइपलाइन जीर्ण झाल्यामुळे शहरवासीयांना दूषित पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कालव्यातून पाइपलाइनने पाणीपुरवठा करणे याविषयी अधिकाऱ्यांमध्ये साशंकता आहे. धरणापासून ४५ कि.मी. अंतरावर असलेला जलसेतू क्षतिग्रस्त झाल्यानंतर मागील वर्षी १ मीटर व्यासाची पाइपलाइन टाकून आसोला मेंढा तलावात पाणी सोडण्यात आले होते. मागील वर्षी गोसेखुर्द धरणाचे पाणी १६० कि.मी.पर्यंत नेण्यात आले. १० हजार हेक्टरच्या वर पिकांना पाणी दिले. त्यामुळे ९५ कोटींची पिके वाचविण्यात आल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.- अ.ज. सांगोडे, कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द उजवा कालवा विभागयंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पाणी साठविण्यापर्यंत धरणाचे काम झाले आहे. परंतु पाण्याचा वापर कसा करायचा याबाबतचे धोरण स्पष्ट नाही. कालव्याऐवजी पाइपलाइनने पाणी देणे शक्य असले तरी पाइपलाइनसाठी भूसंपादन करावे लागणार नाही. असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही.- विलास भोंगाडे, संयोजक, गोसेखुर्द संघर्ष समिती