शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

व्यायाम करताना आहारही महत्त्वाचा!

By admin | Updated: July 2, 2017 01:25 IST

सुंदर, पीळदार शरीर असण्याची भावना तरुणांसह तरुणींमध्ये रुजत आहे. मात्र प्रत्यक्षातील आव्हानांकडे युवावर्ग कानाडोळा करतो. आपली

- चेतन पाठारे सुंदर, पीळदार शरीर असण्याची भावना तरुणांसह तरुणींमध्ये रुजत आहे. मात्र प्रत्यक्षातील आव्हानांकडे युवावर्ग कानाडोळा करतो. आपली कुवत लक्षात न घेता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून कौटुंबिक वैद्यकीय स्थिती लक्षात न घेता रात्रीत शरीर कमवण्याच्या नादात थेट मृत्यूला कवटाळतो. याची प्रचिती गत आठवड्यात वसई आणि नाशिकमध्ये घडलेल्या घटनांमधून आली आहे. त्यामुळे तरुणांनी सजग राहणे गरजेचे आहे. तरुण वयात शरीर ‘पीळदार’ असावे ही भावना मुलांच्या मनात जागृत होते; तर ‘फिगर’ मेंटेन करण्याची गरज असल्याचा विचार तरुणींच्या डोक्यात येतो. त्यामुळे शोध सुरू होतो व्यायामशाळा आणि फिटनेस ट्रेनिंग सेंटर, फिटनेस अ‍ॅकॅडमी अशा गोष्टींचा.फिटनेस आणि त्याबाबतची जागरूकता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली आहे. सुदृढ भविष्याच्या दृष्टीने ही बाब चांगली असेलही, मात्र शरीराची कुवत, जीवनशैली, आहार आणि कुटुंबातील अनुवांशिक वैद्यकीय आजार यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून एका रात्रीत शरीर कमावण्याच्या ‘मृगजळा’कडे सध्या तरुण-तरुणी ओढले जातात. व्यायामशाळा अथवा फिटनेस अ‍ॅकॅडमीमध्ये जाणे गैर नाही. मात्र तेथे गेल्यावर काही उपाययोजना करणे गरजेचेआहे. बहुतांशी युवावर्गाकडूनकुटुंबातील मेडिकल कंडिशन अर्थात कौटुंबिक वैद्यकीय स्थिती सांगितली जात नाही. परिणामी, त्याचा फटका युवावर्गाला बसतो.आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणावाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, तणावामुळे मधुमेह, हार्ट-अ‍ॅटॅक यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. हल्लीच्या युवा पिढीमध्ये तणाव घालण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. झोपेत असल्यानंतर शरीर रचना नव्याने उभारी घेत असते. परिणामी, धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप न घेता व्यायामामुळे शरीराची झीज होते. शरीर रचनेला उभारीसाठी पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी, रक्तदाब वाढणे, हार्ट-अ‍ॅटॅक यांसारख्या आजारांना ऐन तारुण्यातच कवटाळावे लागते. व्यसनांमुळे स्ट्रेस दूर होतो ही समजूत चुकीची आहे. ही महत्त्वाची गोष्ट युवा वर्गाने लक्षात घेणे गरजेचे आहे.अस्तित्वात असलेल्या व्यायामशाळा, फिटनेस अ‍ॅकॅडमी हे वन टाइम इन्व्हेंस्टमेंट म्हणून व्यवसाय उभे राहू लागले आहेत. या व्यायामशाळा उभारणीसाठी कोणतीही नियमावली अस्तित्वात नाही. किंबहुना त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. शरीर कमावण्यासाठी व्यायामाची गरज आहे. मात्र व्यायामासह डाएटही तितकाच महत्त्वाचा मानला गेला आहे. सध्या बहुतांशी व्यायमशाळांत आणि फिटनेस अ‍ॅकॅडमीमध्ये अनुभवी डाएटिशीअनची नेमणूक केली जात नाही. अशा वेळी संबंधित ट्रेनर अथवा संचालक अर्धवट माहिती देतो. त्यामुळे डाएटवर दुर्लक्ष करून केवळ व्यायाम करणे हे शरीरासाठी अयोग्य असते. एकंदरीत तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवावर्गाने शरीर कमावण्याच्या बाबतीत योग्य संयम राखणे गरजेचे आहे. मुळात कोणतीही गोष्ट अल्पावधीत साध्य केली जात नाही. कमी वेळात मिळालेले यशाचे भविष्य अपयशी ठरल्याची उदाहरणे इतिहासात दिसून येतात. त्यामुळे मेहनत, श्रम करण्याची शारीरिक क्षमता, योग्यडाएट, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुरेशी झोप आणि कौटुंबिक वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर योग्य व्यायाम करून सुदृढ शरीर बनवणे गरजेचे आहे. कारण वय आहे आज तरीही, मृत्यूचे भय आहे...(लेखक जागतिक बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिजीक फेडरेशनचे सहसचिव आहेत.)ही दक्षता घ्याएका रात्रीत शरीरसौष्ठवपटू होणे हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे युवा वर्गाने संयम बाळगणे, योग्य डाएट पाळून व्यायाम करणे गरजेचे आहे. इंटरनेटवरील सर्व माहिती खरी असेलच असे नाही. त्यामुळे ती माहिती तपासूनच अंमलात आणावी. व्यायामशाळेतील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला मानणे गरजेचे आहे. जीवनशैलीमध्ये मानसिक त्रास कमी करण्यासाठी व्यसने टाळावीत. दुसऱ्या व्यक्तींशी स्वत:च्या शरीराची तुलना करू नये. - सचिन सोनावणे,फिटनेस तज्ज्ञ(शब्दांकन : महेश चेमटे)