शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त महामार्गाविरोधात ‘आहार’

By admin | Updated: April 4, 2017 06:09 IST

मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिलपासून बंदीचा आसूड उगारला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिलपासून बंदीचा आसूड उगारला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सर्वाधिक महसूल देणारा हॉटेल उद्योग कोलमडू लागला आहे. परिणामी, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तोडगा काढण्याची मागणी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे (आहार) अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.शेट्टी म्हणाले की, सर्व नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी असतानाही, सर्वोच्च न्यायालयाच्या अचानक आलेल्या एका निर्णयामुळे हॉटेल उद्योग डबघाईला आला आहे. न्यायालयाच्या बंदीविरोधात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांनी तातडीने राष्ट्रीय आणि राज महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा तोडगा काढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन हा प्रश्न निकाली काढावा. रेस्टॉरंट आणि बार उभारताना मालकांनी कर्जे घेतली आहेत. त्यामुळे तत्काळ तोडगा न काढल्यास, शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागेल, असे सदस्यांचे म्हणणे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकबंदीसंदर्भात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) मंगळवारी, ४ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या वेळी बंदीमुळे रोजगारावर होणारे परिणाम आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्यातील १३ हजार ६५५ बार आणि मद्यविक्री करणारी दुकाने बंद झाली आहेत. त्यात मुंबईतील ५०० बार आणि दुकानांचा समावेश आहे.बार बंद करून केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवले, तरी राज्यातील ९ हजार ९२५, तर मुंबई महानगर क्षेत्रातील २ हजार बार व रेस्टॉरंट बंद होण्याची भीती आहे.यामुळे राज्याचा सुमारे ७ हजार कोटींची महसूल बुडणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजगारावर न्यायालयाच्या या बंदीमुळे गदा येणार आहे.