शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिब्रिटो, कुऱ्हेकर महाराज यांना पुरस्कार

By admin | Updated: July 28, 2015 02:36 IST

साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार

मुंबई : साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार सोमवारी जाहीर केले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पुरस्कारांची घोषणा केली.संत साहित्यावर उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे आहे. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण व प्रा. रामदास डांगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिब्रेटो आणि कुऱ्हेकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली. सय्यद भाई, भास्करराव आव्हाड, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ. प्रशांत सुरू, सिसिलिया कार्व्हालो आणि गुरुप्रसाद पाखमोडे यांनी समितीत काम पाहिले.आषाढी एकादशीच्या औचित्यावर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून, वरील दोन्ही पुरस्कार या मान्यवरांना स्वतंत्र कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तावडे यांनी सांगितले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो : लेखक, साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठीमध्ये बायबल लिहिले असून, त्यांना यासाठी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संतांच्या कार्याविषयीचा त्यांचा गाढा अभ्यास असून, विशेषत: मराठी भाषेसाठी त्यांनी केलेले कार्यही वाखाणले जाते. हिंदू, बौद्ध, इस्लाम, जैन आदी धर्मसंस्कृतीचांही त्यांनी अभ्यास केला आहे.मारोती कुऱ्हेकर : मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी वयाच्या २३व्या वर्षी शालेय शिक्षण संपवून १९५६ साली अध्यात्मक ओढीने आळंदी येथे जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. स्वत: कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यात पारंगत झाल्यानंतर ते स्वत: अध्यापकाच्या भूमिकेतून अध्यात्मिक विद्यादानाचे कार्य निस्पृहपणे करीत आहेत. अध्यापनाबरोबर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून आजवर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविण्याचे काम त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ केले आहे. अनेक प्रबोधनकार आज त्यांच्यामुळेच समाजप्रबोधनाचे काम यथार्थतेने करीत आहेत. मारोती महाराज यांच्या वारकरी संस्थेस २०१७मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (प्रतिनिधी)