शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपानामुळे होणार्‍या फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान संगणकाद्वारे

By admin | Updated: July 6, 2014 19:43 IST

फझी एक्स्पर्ट : अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले नवे सॉफ्टवेअर

अकोला : धूम्रपानामुळे होणार्‍या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संगणकीय निदान करणारी यंत्रणा अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केली आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करण्यात व्यर्थ होणारा वेळ फझी एक्स्पर्ट नावाच्या या सॉफ्टवेअरमुळे वाचणार असल्याने, रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि धुम्रपानामुळे तोंड, घसा, फुप्फुस, पोट, किडनी आणि मुत्राशयाचा कर्करोग होतो. भारतात, विशेषत: महाराष्ट्रात फुप्फुसाच्या कर्करोगामुळे दगावणार्‍यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. फुप्फुसाच्या या कर्करोगाचे निदान करण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित अकोलानजिकच्या बाभुळगाव येथील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालयातील संगणक विभागाचे विद्यार्थी अभिषेक लालवाणी, अक्षय श्रीवास्तव, श्‍वेता भिरड आणि किंजल टांक यांनी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत सातारकर आणि डॉ. विकास विरवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सलग सहा महिन्यात झपाट्याने वजन कमी होणे किंवा खोकलताना रक्त येणे, अशी लक्षणे दिसणार्‍या रूग्णाची रक्त तपासणी करून, तपासणीत आढळणार्‍या घटकांचे प्रमाण फझी एक्स्पर्ट नावाच्या या सॉफ्टवेअरमध्ये टाकताच कर्करोगाची तिव्रता आणि संबंधित सर्व माहिती लगेच कळते.अनेकदा एमआरआय केल्यानंतरही शरीरात आढळून आलेली गाठ कर्करोगाची आहे किंवा नाही, याचे निदान करण्यासाठी बायोप्सी करावी लागते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कर्करोगाच्या गाठीचा आकार कळण्यास मदत होते. ग्रामीण भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही केल्या व्यसन न सोडू शकणार्‍या व्यक्तीस कर्करोग आहे किंवा नाही, याची माहिती या सॉफ्टवेअरच्या मदतीने तातडीने मिळणे शक्य असल्याने ग्रामीण भागातील डॉक्टरही या प्रणालीद्वारे कर्करोगाचे निदान करू शकतील, अशी आशा या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. शिवाजी इंजिनिअरिंगच्या या विद्यार्थ्यांनी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने हे सॉफ्टवेअर विकसित केले असल्याने, कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारा वेळ वाचण्याची शक्यता असल्याचे संगणक विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत सातारकर यांनी सांगितले.