शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

धुळे - ४०० गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण?

By admin | Updated: August 22, 2016 19:46 IST

शहरातील मनपा मालकीच्या ३९ व्यापारी संकुलातील एकूण ८८५ गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण झाल्याची शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २२  : शहरातील मनपा मालकीच्या ३९ व्यापारी संकुलातील एकूण ८८५ गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण झाल्याची शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे़ तर दुसरीकडे गाळ्यांचे भाडे, हस्तांतरण फीकडेही दुर्लक्ष झाल्याने मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, एवढेच नव्हे तर बाजार शुल्क वसुलीदेखील गेल्या वर्षभरापासून रखडली आहे़. 

विनापरवानगी हस्तांतरणमनपाने १३ जानेवारी २०१६ ला झालेल्या महासभेत गाळे हस्तांतरण फीमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसा ठरावही करण्यात आला़ मात्र मनपाच्या एकूण गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण होऊनही मनपाकडे हस्तांतरणासाठी एकही प्रस्ताव आलेला नाही़ प्रस्तावच आलेले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही़ त्यामुळे मनपाच्या गाळ्यांचे सर्रास हस्तांतरण केले जात असूनही मनपा प्रशासन अंधारात आहे़ शिवाय कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणीदेखील सोडले जात आहे़.

पाचपट होते आकारणीमनपाने महासभेच्या ठरावानुसार रेडिरेकनर दरानुसार गाळ्यांची भाडे आकारणी सुरू केली आहे़ नवीन दरानुसार गाळेधारकांना भाडे आकारणी करून बिले वितरित करण्यात आली आहेत़ पूर्वी ९०० ते ७२०० पर्यंत असलेले दुकान भाडे रेडिरेकनर दरामुळे थेट २० हजार ७० हजारांवर पोहचले आहे़ एवढे भाडे असताना मनपा प्रशासन गाळा हस्तांतरासाठी दुकानाच्या वार्षिक भाड्याच्या पाचपट रक्कम आकारणी करत असल्याने कुणीही मनपाकडे हस्तांतरणाची परवानगी घेण्यासाठी धजावत नाही़ काही गाळेधारकांनी हस्तांतरणासाठी परवानगी घेण्याचा प्रयत्नही केला; मात्र मनपाची हस्तांतरण फी आकारणी पाहून त्यांनीही माघार घेतली आहे़.

करार संपले, दुप्पट आकारणी!मनपाने करारावर दिलेल्या गाळ्यांपैकी ज्या गाळ्यांची मुदत संपली आहे, त्यांना दुप्पट कर आकारणी केली जाते़ पाचकंदील मार्केट परिसरातील बहुतांश गाळ्यांचे करार संपले असल्याने त्यांना वार्षिक दुकान भाडेदेखील दुप्पट आकारले जाते़ जवळपास १०४ गाळेधारकांना दुप्पट आकारणी केली जाते़ पाचकंदील मार्केटमधील बहुतांश गाळे मूळ मालकांनी हस्तांतरित केले आहेत़ तर अनेक मूळ मालक मृत होऊन बरेच वर्ष उलटल्यानंतरही मनपाकडून मूळ मालकांच्याच नावे आकारणी केली जाते़

अशीही एक समस्या!मनपाकडून ज्या मूळ मालकांनी गाळे घेतले, त्यांनी परस्पर त्या गाळ्यांचे हस्तांतरण केले. मात्र मनपा वसुली विभागाने मालमत्ता करवसुली करताना ज्याने हस्तांतरणातून दुकान घेतले, त्याच्या नावानेच वसुली केली आहे. त्यामुळे चक्क मूळ मालकांचेच नाव बदलले असल्याचीही दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे़ प्रचंड घोळ असलेल्या या विषयात लक्ष घातल्यास मनपाला दरवर्षी पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते़

कारवाईचे ‘राजकारण’पाचकंदील मार्केटप्रश्नी मनपा प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्या विषयाचे राजकारण करण्यात आले़ या ठिकाणी प्रत्येक विषयात राजकारण केले जात असल्याने काही विषय न काढलेलेच बरे, अशी भूमिका अखेर आयुक्त घेताना दिसतात़ मात्र हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे़ शिवाय मनपाचे नुकसान होत असल्याने त्याचा सर्वसामान्य जनतेलाही अप्रत्यक्षपणे फटका बसत आहे़ त्यामुळे मनपाने सर्वांना विश्वासात घेऊन हे विषय हाताळणे आवश्यक असून ठोस कारवाई गरजेची आहे़