शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

धीरूभाई म्हणाले, ‘गडकरी तुम्ही मला खोटं ठरवलं !’

By admin | Updated: August 30, 2015 02:42 IST

पेट्रोल पंप आॅपरेटरपासून सुरुवात करणाऱ्या धीरूभाई अंबानींना सरकारी कामाची पद्धत माहीत होती. त्यामुळेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी हे मुंबई- पुणे

नागपूर : पेट्रोल पंप आॅपरेटरपासून सुरुवात करणाऱ्या धीरूभाई अंबानींना सरकारी कामाची पद्धत माहीत होती. त्यामुळेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी हे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे पूर्ण करू शकणार नाहीत, हे गृहीत धरून धीरूभार्इंनी त्यांना प्रकल्प पूर्ण करून या, आपण पुन्हा भेटू, असे सांगितले होते. मात्र गडकरी वेळेत प्रकल्प पूर्ण करून आले. त्यावेळी धीरूभाई म्हणाले, गडकरी तुम्ही जगातील पहिले व्यक्ती आहात ज्याने मला खोटं ठरवलं ! मी त्या घटनेचा साक्षीदार आहे, अशी आठवण अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांनी सांगितली आणि सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. मिहानमध्ये उभारण्यात येणाऱ्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कचा भूहस्तांतरण सोहळा शुक्रवारी नागपुरात झाला. या वेळी अनिल अंबानी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नागपूरचा उल्लेख ‘आॅरेंज सिटी‘ व ‘टायगर कॅपिटल आॅफ इंडिया’ असा करीत मी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन वाघांमध्ये बसलो असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या वेळी अनिल अंबानी यांनी १९९७-९८ सालची स्वत: अनुभवलेली एक आठवण सांगितली.ते म्हणाले की गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेच्या बांधकामाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी धीरूभाई अंबानी यांना घरी निमंत्रित केले. त्यावेळी धीरूभाई व गडकरी यांच्यात बरीच चर्चा झाली. मी तरुण होतो. सर्व काही ऐकत होतो. शेवटी गडकरींनी हा प्रकल्प राज्य सरकारमार्फत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. गडकरींची दूरदृष्टी व आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो.धीरूभार्इंच्या पाठीशी मोठा अनुभव होता. ते गडकरींना म्हणाले, ‘बोलण्यापेक्षा कृती ही जास्त प्रभावी असते. तुम्ही प्रकल्प पूर्ण करा, आपण नंतर पुन्हा भेटू.’ सरकारी खाक्यात हा प्रकल्प पूर्ण होणार नाही व गडकरी पुन्हा कधीच भेटीला येणार नाही, हे धीरूभार्इंना अभिप्रेत होते. मात्र, गडकरींनी रेकॉर्ड वेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पूर्ण केला. वडिलांनाही आश्चर्य वाटले. गडकरी प्रकल्प पूर्ण करून धीरूभार्इंना भेटायला आले. त्यावेळी धीरूभाई गडकरींना म्हणाले, ‘तुम्ही जगातील असे पहिले व्यक्ती आहात की ज्यांनी धीरूभार्इंना खोटे ठरविले.’ त्यांनी गडकरींना शाबासकी दिली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच धीरूभार्इंच्या तोंडून असे शब्द ऐकले होते, असे त्यांनी सांगितले.यानंतर गडकरी यांनीही धीरूभार्इंची एक आठवण सांगितली. गडकरी म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन मुंबईत आले होते. तेव्हा मी व नारायण राणे विरोधी पक्षनेते होतो. धीरूभाई, विलासराव व बिल क्लिंटन बाजूला चहा पीत होते. धीरूभार्इंना मी दिसताच त्यांनी मला बोलावून घेतले व हे तेच मंत्री आहेत ज्यांनी मुंबईत उड्डाण पूल बनविले, ‘अ मॅन आॅफ ब्रिजेस’, असे सांगत माझी बिल क्लिंटनशी ओळख करून दिली. या वेळीही सभागृहाने टाळ्यांचा प्रतिसाद दिला. धीरूभाई आपल्याला तिसऱ्या मुलाप्रमाणे मानत होते, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.