शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी उद्या

By admin | Updated: November 28, 2014 00:59 IST

लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिटणीस पार्क, महाल येथे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या

गोवा व महाराष्ट्रातील संघांचा दांडिया आविष्कार नागपूर : लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिटणीस पार्क, महाल येथे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई व ‘ऐका दाजिबा’फेम वैशाली सामंत यांचा सुपरहीट गीतांचा नजराणा राहणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परिक्षक स्टार प्रवाहवरील जयोस्तुते मालिकेचे निर्माता महेश कोठारे, रुंजी मालिकेतील मिनाक्षी पिटकर (सुरेखा कुडची), लक्ष्य मालिकेतील पोलीस निरीक्षक रेणुका राठोड (श्वेता शिंदे), तर पुढचे पाऊल मालिकेतील कल्याणी (जुई गडकरी) राहतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क असून लोकमत सखी मंच सदस्य, युवा नेक्स्ट सदस्यांना ओळखपत्रावर प्रत्येकी दोन पासेस तर दांडियाच्या जाहिरातीचे कात्रण आणणाऱ्यांनाही दोन पासेस मिळणार आहे. पासेस सकाळी ११ ते ६ वाजेदरम्यान लोकमत सखी मंचच्या कार्यालयात मिळतील. दरवर्षी गोव्यासह महाराष्ट्रातही ही स्पर्धा घेण्यात येते. प्राथमिक फेरी, जिल्हास्तरीय फेरी, उपांत्यपूर्व फेरी आणि अंतिम फेरी, असे स्पर्धेचे स्वरूप असते. यामध्ये पहिला पुरस्कार ५१,०००, द्वितीय पुरस्कार ३१,००० तर तिसरा पुरस्कार २१,००० रु. दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजकत्व रायसोनी समूहाचे असून, पारितोषिक प्रायोजक युनिक स्लीम पॉर्इंट अ‍ॅन्ड ब्युटी क्लिनिक हे आहेत. विशेष सहकार्य शशिकांत बोदड यांचे आहे. अधिक माहितीकरिता नेहा जोशी ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ व २४२९३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)धमाल दांडियाची विदर्भ फेरी आजधमाल दांडिया स्पर्धेची नागपूर आणि विदर्भ फेरीचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी कॉटनमार्केट मार्गावरील गीता मंदिरात करण्यात आले आहे. नागपूर फेरी सकाळी १० वाजता तर विदर्भ फेरी १२ वाजता होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सखी व वाचक वर्ग सादर आमंत्रित आहे.