शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

देवीदास पिंगळे यांचा जामीन फेटाळला

By admin | Updated: March 7, 2017 20:45 IST

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहार

देवीदास पिंगळे यांचा जामीन फेटाळलानाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सुमारे तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह) असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी मंगळवारी (दि़७) फेटाळला़ जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे पिंगळे यांना पुन्हा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून पर्यायाने त्यांच्या कारागृहातील मुक्काम वाढला आहे़नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या १२८ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व बोनसच्या रकमेचा पिंगळे यांनी अपहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ कर्मचाऱ्यांच्या बळजबरीने स्वाक्षऱ्या घेऊन त्यांच्या खात्यातील ५८ लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून ती पिंगळे यांना देण्यासाठी जात असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांना एसीबीने सापळा लावून पकडले व रोकड जप्त केली़ या प्रकरणात चौकशीनंतर देवीदास पिंगळे यांना अटक करण्यात आली़ पिंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायमूर्तीनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना धमकावल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेले अदखलपात्र गुन्हे, अपहाराची मोठी रक्कम तसेच जिल्हा रुग्णालयाने वैद्यकीयदृष्ट्या तंदुरूस्त असल्याचा अहवाल तसेच एसीबीकडील पुरावे या आधारावर फेटाळला होता़ एसीबीने १८ फेब्रुवारीला न्यायालयात दाखल केलेल्या सुमारे दीड हजार पानी दोषारोपपत्रानंतर पिंगळे यांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता़ पिंगळे यांच्या वकीलांनी पुन्हा तीच कारणे जामीनासाठी दर्शविल्याने न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाचा आधार घेत जामीन फेटाळला़जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांच्या न्यायालयात शनिवारी दोन्ही पक्षांच्या वकीलांनी युक्तिवाद केला होता़ त्यानंतर सोमवारी या जामीनावर सुनावणी होणार होती़ मात्र एक दिवस ती पुढे ढकलण्यात आल्याने मंगळवारी यावर सुनावणी झाली़ जिल्हा न्यायालयात आता या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होणार असून पिंगळे यांना जामीनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)