शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

६ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा

By admin | Updated: October 29, 2014 20:50 IST

४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचे अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ - शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केलेली असतानाच शपथविधीच्या चार दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचे अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 
२८८ आमदार असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत १४४ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागांवर विजय मिळालेला आहे. तर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रासपला एका जागेवर विजय मिळाला आहे. यानुसार भाजपाचे सध्याचे संख्याबळ १२३ आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे जाहीर करत विश्वासदर्शक ठरावाच्या अनुपस्थित राहू असे स्पष्ट केले. भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही.
दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये चर्चेचे गु-हाळ अजूनही सुरुच आहे. युतीसाठी या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. भाजपाला पाठिंबा देणार की नाही याचा निर्णय उद्यापर्यंत जाहीर करु असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. शपथविधी सोहळ्यानंतरच शिवसेनेला सोबत घ्यायची की नाही यावर निर्णय घेऊ असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. ६ नोव्हेंबररोजी विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यामुळे विधीमंडळातील विश्वासदर्शक ठरावात उत्तीर्ण होण्यासाठी भाजपाला अथक मेहनत घ्यावी लागेल असे दिसते.