शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार

By admin | Updated: October 18, 2015 02:21 IST

गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन

नागपूर : गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करून ते राज्य सरकारला सादर केले जाईल. राज्य सरकारने या डॉक्युमेंटचा आधार घेऊन काही योजना अमलात आणल्या तर शेतकऱ्यांना मदत होईल, असा विश्वास केंदीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, रणजित देशमुख, खा. कृपाल तुमाने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. सुनील केदार, अ‍ॅग्रोव्हिजनचे सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर यांच्यासह आमदार व मान्यवर उपस्थित होते.गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर पुढील २५ वर्षांचा विचार केला पाहिजे. शेतीत, जोडधंद्यात यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसमोर मांडल्या पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे आरोग्य तपासयला हवे. यासाठी आमदारांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डाळींचे भाव २०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींच्या उत्पदनाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. यावर पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. मागेल त्याला काम दिले जाईल. पण कामात बेईमानी केली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विदेशात बायो प्लास्टिकची मोठी मागणी आहे. उसाचे चिपाड,मका आदी पिकांपासून बायो प्लास्टिक तयार केले जाते. शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तर एकट्या विदर्भात ५० हजार कोटींचे बायो प्लास्टिक तयार होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात शेतकऱ्यांचे मोठे गट तयार करून त्यांना फूलशेतीचे प्रशिक्षण दिले जाईल. येथीलफुले विदेशात पाठविली जातील. यासाठी लवकरच नागपूर बाजार समितीला जागा उपलब्ध करूनदिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ताडोबात इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाड्याताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रदूषण व आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून एका दिवशी मर्यादित गाड्या जंगलात सोडल्या जातात. यामुळे विदेशी पर्यटकांनाही जंगल सफारीची बुकिंग मिळणे कठीण झाले आहे. येत्या काळात ताडोब्यात इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे ध्वनी व वायु प्रदूषणाचा प्रश्न सुटेल व पर्यायाने जंगलात सोडणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.