शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वसईत पाण्याची रोज राजरोस नासाडी

By admin | Updated: March 6, 2017 03:30 IST

वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवर असलेल्या अनेक व्हॉल्वमध्ये लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते

वसई : वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवर असलेल्या अनेक व्हॉल्वमध्ये लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते आहे.या परिसरातील अनेक भागात आजही पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. अनेक ठिकाणी टँकरनेच पाणी पुरवठा केला जात आहे. असे असतांना महापालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर व्हॉल्व आहेत. त्यातील अनेक व्हॉल्वर लिकेज आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरु असते. नालासोपारा शहर ते हायवे रस्त्यावर संतोषभुवन पासून पुढे लिकेज व्हॉल्वमधून पाणी भरण्यासाठी रात्रंदिवस रांगा लागलेल्या पहावयास मिळतात. हिच परिस्थिती वसई स्टेशन ते हायवे वरील रस्त्यालगत पहावयास मिळते. धक्कादायक बाब म्हणजे ( सोबत असलेल्या फोटोतील ठिकाण) वसई रेल्वे उड्डाणपूल ओलांडल्यानंतर पूर्वेच्या बाजूला असलेल्या पाईप लाईनवर एक व्हॉल्व आहे. हा व्हॉल्व अग्निशमन दलाला आणिबाणीच्या काळात गरज भासल्यास पाणी भरता यावे यासाठी बनवण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुुरु आहे. याठिकाणी पाणी भरण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत लोक त्याचा वापर करतात. ही पाईपलाईन मुख्य रस्त्यालगत आहे. येथून अधिकारी ये-जा करीत असतात, असे असतांनाही पाणी गळती रोखली जात नाही. एकीकडे करदात्यांवर पाणी कपात लादणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या पाणी विभागाकडून ही पाणी गळती तातडीने रोखण्यासाठी ठोस असे उपाय योजले जात नसल्याने वसईकरांचे हजारो लिटर पाणी गेले अनेक महिने वाया जाते आहे.वसई पूवेकडील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाइपलाईनवरील व्हॉल्व मध्ये गळती असल्याने पाणी वाया जात असून लोक त्याठिकाणी कपडे धूत असतात.