शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपसचिव, आयुक्तांची चौकशी

By admin | Updated: July 14, 2016 03:57 IST

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई-टेंडरिंगची प्रक्रिया डावलून मुख्याध्यापकांमार्फत रेनकोट खरेदी करण्याच्या प्रकारावर उच्च न्यायालयाने आज सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली

मुंबई : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई-टेंडरिंगची प्रक्रिया डावलून मुख्याध्यापकांमार्फत रेनकोट खरेदी करण्याच्या प्रकारावर उच्च न्यायालयाने आज सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. शिवाय, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिल्याने आदिवासी विभागाचे उपसचिव आणि नाशिक विभागाच्या आयुक्तांसह अनेक अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर माघार घेत सरकारने आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई- टेंडरिंगद्वारेच रेनकोट खरेदी करण्यात येईल, तसेच दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. नाशिक, ठाण्यासह १२ विभागांतील आश्रमशाळांसाठी ई- टेंडरद्वारे रेनकोट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी दिले होते. मात्र, प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आदिवासी विकास विभागाच्या उपसचिवांनी ही प्रक्रिया रद्द करत, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना तीन लाख रुपयांपर्यंत रेनकोट घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला मेसर्स सुपर पॉलिमर्स या कंपनीने आव्हान दिले. न्यायालयाने २४ जून रोजी रेनकोट खरेदीला स्थगिती दिली. राज्य सरकारने आउटवर्ड रजिस्टरमध्ये फेरफार करत उर्वरित १७ विभागांना रेनकोट खरेदीचे आदेश दिले. आउटवर्ड रजिस्टरमध्ये २२ जून रोजी आदेश दिल्याचे दाखवण्यात आले. मात्र, ही लबाडी आज न्यायालयाच्या निदर्शनास आली. (प्रतिनिधी)