शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा ‘आत्मा’ आॅक्सिजनवर!

By admin | Updated: September 2, 2014 01:05 IST

कृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचाव्या, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख पटावी, उत्पादनात वाढ व्हावी व देशातील बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, या उदात्त हेतूने गत चार

बदल्यांचा खेळ : दीड महिन्यांपासून नियुक्ती हवेतजीवन रामावत - नागपूरकृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचाव्या, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख पटावी, उत्पादनात वाढ व्हावी व देशातील बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, या उदात्त हेतूने गत चार वर्षांपूर्वी कृषी विभागाचे विभाजन करून, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. परंतु सध्या नागपुरातील हा विभाग शेतकऱ्यांना समृद्ध करण्याऐवजी स्वत:च अनिश्चितेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. या विभागाच्या प्रमुख तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. नलिनी भोयर यांची गत दीड महिन्यापूर्वी अचानक रोजगार हमी योजना विभागात बदली करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. शिवाय त्यांच्या जागी कुणाची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे गत दीड महिन्यापासून हा विभाग अक्षरश: वाऱ्यावर आहे. गत १५ जुलै रोजी डॉ. भोयर यांचा बदली आदेश जारी झाला. मात्र असे असताना, त्यांनी अजूनपर्यंत येथील खुर्ची सोडलेली नाही. शिवाय शासनाला त्यांना कार्यमुक्त करण्याची गरजही वाटली नाही. मग, त्यांच्या बदलीचा हा सर्व खेळ कशासाठी, असा सध्या सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे या सर्व घडामोडींचा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होऊ लागला आहे. माहिती सूत्रानुसार डॉ. भोयर यांची ही बदली त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बदली आदेश जारी होताच, त्यांनी तो रद्द करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. शेवटी एका ठिकाणी त्यांना बदली आदेश रद्द करण्याचे आश्वासन मिळाले. कदाचित त्यामुळेच अजूनपर्यंत त्या येथून कार्यमुक्त झाल्या नसल्याची चर्चा आहे. अलीकडे ‘आत्मा’ या विभागाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याशी निगडित महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.