शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू डासाच्या अळ्या आढळल्यास दंड!

By admin | Updated: October 14, 2014 01:00 IST

घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या दिसून आल्यास त्या घरमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार महानगरपालिका करीत आहे. यासाठी कायद्यात तरतूद करण्याचा प्रस्ताव

नागपूर : घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या दिसून आल्यास त्या घरमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार महानगरपालिका करीत आहे. यासाठी कायद्यात तरतूद करण्याचा प्रस्ताव हिवताप व हत्तीरोग विभागाने मनपाच्या संबंधित विभागाकडे पाठविला आहे.डेंग्यू रोगावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची तपासणी मोहीम सुरू आहे. डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्यास त्यावर उपाययोजना केल्या जात आहे. परंतु त्याच त्याच घरांमध्ये अळ्या आढळून येत असल्याने विभागाला काम करणे कठीण झाले आहे. सध्याच्या स्थितीत विभागाकडून अळ्या आढळून येणाऱ्या घरमालकाला नोटीस दिली जात आहे. परंतु याचा परिणाम दिसून येत नसल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. घरांमध्ये डेंग्यू रोगाचे रुग्ण असतानाही लोक गंभीर नाही. यावर कठोर कारवाई करण्यासाठी हिवताप व हत्तीरोग विभागाने पाऊल उचलले आहे. डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्याची परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या संदर्भात कायदा तयार करण्यासाठी मनपाच्या संबंधित विभागाला पत्र पाठविल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)डेंग्यूचा दुसरा बळीशहरात या वर्षी डेंग्यूचे १३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एका मृत्यूची नोंद होती. परंतु १ आॅॅक्टोबरला डेंग्यू संशयित तापाने मृत्यू झालेल्या माधवनगर येथील पद्मजा दाणी या तेरा वर्षीय मुलीच्या रक्ताचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. डेंग्यूमुळे बळीची संख्या दोन झाली आहे.