कोल्हापूर : येथील वीरश्री विनोद माने (3क्, सुभाषनगर, कोल्हापूर) या विवाहितेचा सोमवारी दुपारी डेंग्यूने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी असलेल्या वीरश्री यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्यानंतर रक्ताच्या चाचणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू झाले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)