शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोडसे पुण्यतिथीविरोधात निदर्शने

By admin | Updated: November 16, 2015 03:42 IST

महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा

पनवेल : महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा एकदा नव्याने वादाला तोंड फुटले आहे. महाराणा प्रताप बटालीयनच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध केला असून, कार्यक्र म स्थळी निदर्शने केली.महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने २००८ पासून नवीन पनवेलमधील पृथ्वी हॉलमध्ये नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी क्रांतिकारी शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर हे या कार्यक्र माचे आयोजक होते. या कार्यक्र मात एल.आर. बाली लिखित वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशनदेखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्र माला सनातन संस्थेचे अभय वर्तक हे उपस्थित होते. यावेळी प्रीतम कुमार त्यागी, सुरेश जाधव, स्वामी रु द्र गुप्ताचार्य, शर्मेश राठोड, महेश पवार, संतोष मोकल, चंद्रकांत राजपूत, बजरंग म्हात्रे आदींसह शेकडो संख्येने नथुराम गोडसे याचे समर्थक व महाराणा प्रताप बटालियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्र माला काँग्रेसने विरोध दर्शवत कार्यक्र मस्थळी काळे झेंडे फडकावले. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी निदर्शने करण्यात आली. हा देश गांधींचा, नाही चालणार मारेकऱ्यांचे उदात्तीकरण, नाव घेता गांधींचे उदात्तीकरण गोडसेचे, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देत, यावेळी कार्यक्रमाला विरोध केला. (प्रतिनिधी)पुणे : गोडसे परिवारातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशनाला विवेकवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. अशा माणसाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. गोडसेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला नव्हता; तर पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.गोडसे परिवारातर्फे रविवारी सायंकाळी नानासाहेब गोडसे यांच्या आनंदी विलास येथे अस्थिकलश दर्शन आणि चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच गोडसेवरील ‘नथुराम एक हुतात्मा संत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होते. सामाजिक संघटना व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी या पुस्तक प्रकाशनास विरोध दर्शविला.