शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅग्नेस...’बंदीची मागणी फेटाळली

By admin | Updated: October 6, 2015 03:19 IST

अ‍ॅग्नेस आॅफ गॉड’ या नाटकावर बंदी आणण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली. मात्र नाटकाचे चित्रीकरण करून हरकत घेण्यायोग्य भाग आहे का ते पडताळून पाहावे, असा आदेश

मुंबई : ‘अ‍ॅग्नेस आॅफ गॉड’ या नाटकावर बंदी आणण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली. मात्र नाटकाचे चित्रीकरण करून हरकत घेण्यायोग्य भाग आहे का ते पडताळून पाहावे, असा आदेश अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिला.‘अ‍ॅग्नेस आॅफ गॉड’ या नाटकात ख्रिस्ती समाजाबद्दल विकृत चित्रण केले आहे. त्यामुळे या नाटकावर बंदी घालण्याची मागणी कॅथॉलिक सेक्युलर फोरमने सरकारकडे केली होती. यासंदर्भात कॅथॉलिक ख्रिश्चन फोरमचे जोसेफ डायस यांनी खडसे यांची भेट घेतली. मात्र नाटकाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले असल्याने त्यावर बंदी आणता येणार नाही, अशी भूमिका खडसे यांनी घेतली. मात्र त्याचवेळी या नाटकाबद्दल जर काही तक्रार असेल तर कॅथॉलिक सेक्युलर फोरमने सेन्सॉर बोर्डाकडे किंवा न्यायालयात धाव घ्यावी, असे मतही खडसे यांनी व्यक्त केले. नाटकात काही आक्षेपार्ह भाग आहे किंवा कसे ते तपासून पाहण्याकरिता त्याचे चित्रीकरण करण्यात येईल व काही आक्षेपार्ह आहे का ते तपासून पाहिले जाईल, असे ते म्हणाले. नाटकाचे दिग्दर्शक कैझाद कोतवाल यांनीही मंत्री खडसे यांची भेट घेऊन आपले म्हणणे सादर केले. (विशेष प्रतिनिधी)काय आहे नाटकात?‘अग्नेस आॅफ गॉड’ हे नाटक न्यू यॉर्कमधील एका सत्यघटनेवर आधारित आहे. नाटकातील नायिका नन असते आणि ती एका मुलाला जन्म देते. तिच्यावर खटला भरला जातो. पण आपण व्हर्जिन असल्याचा दावा ती न्यायालयात करते, असे या नाटकाचे कथासूत्र आहे.