शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दैवाने दिले, घालवले: डॉ.रजनीश धेडियांची व्यथा

By admin | Updated: October 18, 2016 03:28 IST

डॉ. रजनिश महादया धेडिया या तीस वर्षीय युवकाची इचलकरंजी येथे वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली

अनिरुद्ध पाटील,

डहाणू / बोर्डी- तलासरी तालुक्यातील वेवजी गावचा डॉ. रजनिश महादया धेडिया या तीस वर्षीय युवकाची इचलकरंजी येथे वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली. नोकरीवर हजर राहण्यासाठी स्वारगेट बसस्थानकातून १२ आॅक्टोबरच्या रात्री बसने प्रवासाकरिता निघाला होता. या वेळी प्रवसा दरम्यान लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्र आणि सामानाची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली आहे. या बाबत रजनिश यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून गहाळ सामान सापडलेले नाही. त्यामुळे धेडिया कुटुंबियांवर संकट ओढावले आहे.पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्याच्या वेवजी गावात महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दुर्गम आदिवासी कुटुंबात रजनिश महादया धेडिया राहतो. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर जिद्द आणि कठोर प्रयत्नाने मात करून एमबीबीएस आणि एमडीपर्यंतचे शिक्षण घेतले. या करिता अनेकवर्ष कुटुंबापासून लांब वसतिगृहात काढली. त्यानंतर कोल्हापूर येथील इचलकरंजीत वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली. मात्र फार काळ आनंद टिकला नाही. १२ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस स्वारगेटहून इचलकरंजीकडे बसने प्रवासा दरम्यान लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्र आणि सामान ठेवलेली बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली. रजनिश याने तत्काळ स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र गहाळ सामान सापडलेले नाही. त्यामुळे नोकरीचा प्रश्न निर्माण झाल्याने तलासरी येथील त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचे सावट आहे. दुर्गम आदिवासी गावातल्या सामान्य घरातील मुलाने डॉक्टर होणे आजही अवघड गोष्ट आहे.सोशल मीडियाचे माध्यम आणि लोकमत बातमीतून कागदपत्र मिळविण्यात सहाय्य मिळेल असा विश्वास रजनिश, त्याचा भाऊ नितिन आणि धेडिया कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. >कठोर प्रयत्नाने मात करून शिक्षण घेतले. नोकरीकरिता रुजू होण्यासाठी जात असताना प्रवासादरम्यान लॅपटॉपसह, शैक्षणिक कागदपत्र आणि समानाची चोरी झाली आहे. सामान सापडणे अत्यंत आवश्यक आहे. - रजनिश धेडिया (तक्र ारदार)