शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्टमंडळांना विधिमंडळात ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: July 14, 2015 00:09 IST

राज्यातील कोणत्याही शिष्टमंडळाला विधिमंडळ अधिवेशनाच्या कार्यकाळात विधान भवनात येऊन मंत्री, अधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

- यदु जोशी,  मुंबईराज्यातील कोणत्याही शिष्टमंडळाला विधिमंडळ अधिवेशनाच्या कार्यकाळात विधान भवनात येऊन मंत्री, अधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या काळात मंत्र्यांनी ब्रिफिंगसाठी अधिकाऱ्यांना आपल्या दालनात न बोलविता त्यांच्या निवासस्थानी बोलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधिमंडळ सचिवालयाने काढलेल्या या आदेशाने मंत्र्यांची पंचाईत होऊ शकते. बरेचदा विधिमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी मंत्री हे अधिकाऱ्यांना विधान भवनातील आपल्या कक्षात बोलावून घेतात. बरेचदा मंत्री सभागृहात जाईपर्यंत ब्रिफिंग घेत असतात. आता त्यांना तसे करता येणार नाही. अधिवेशन काळात विधिमंडळावर येणारे बहुतेक सर्व मोर्चे आझाद मैदानापर्यंत येतात आणि त्या ठिकाणी मंत्री मोर्चाला सामोरे जातात किंवा मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीसाठी विधान भवनात येते. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूस एक मंडप टाकलेला असतो. त्या मंडपात मंत्री मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटतात किंवा शिष्टमंडळाला विधान भवनातील आपल्या दालनात भेटीसाठी बोलवितात, अशी आतापर्यंतची पद्धत होती. मात्र आता मोर्चेकऱ्यांच्या वा इतर कुठल्याही शिष्टमंडळाला विधान भवनात येऊन मंत्र्यांची भेट घेता येणार नाही. पीठासीन अधिकारी व विरोधी पक्षनेते यांना रोज १० प्रवेशपत्रिका देण्यात येतील. मंत्री/राज्यमंत्री यांना दैनंदिन पाच प्रवेशपत्रिका छायाचित्रांसह (वेब कॅमेऱ्याने काढलेल्या) देण्यात येतील. या प्रवेशपत्रिका संबंधित मान्यवरांच्या स्वाक्षरीने अथवा खासगी सचिवांच्या सहीचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतरच वितरीत करण्यात येणार आहेत. ुवाढत्या गर्दीवर उपाययोजनाविधान भवन इमारतीमध्ये होणाऱ्या वाढत्या गर्दीमुळे प्राथमिक सुविधांवर पडणारा ताण कमी व्हावा तसेच सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी अगदी आवश्यक तेवढेच अधिकारी/ कर्मचाऱ्यांना आणि अभ्यागतांना विधान भवन प्रवेशपत्रिका देण्यात येणार आहेत.