शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

उसाच्या कमतरतेने इथेनॉल उत्पादन घटले

By admin | Updated: March 2, 2017 01:21 IST

यंदा उसाची कमतरता, तरीदेखील काही कारखान्यांनी धाडस करून गळीत हंगाम सुरू केला.

महेंद्र कांबळे,बारामती- यंदा उसाची कमतरता, तरीदेखील काही कारखान्यांनी धाडस करून गळीत हंगाम सुरू केला. परंतु, इथेनॉलनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मोलॅसिसचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे इथेनॉलनिर्मितीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. त्यातच केंद्र सरकारने अबकारी कर पुन्हा लागू केल्यामुळे आता इथेनॉल पुरवठ्यासाठी ३९ रुपये दर निश्चित केला आहे. तो कारखान्यांना न परवडणारा असल्याचे सांगण्यात येते. देशात सर्वाधिक इथेनॉल प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. सरकारने इथेनॉल खरेदीचा निर्णय हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी घेतला. त्याचा फटकादेखील कारखान्यांना बसला आहे. त्याचबरोबर इथेनॉलनिर्मितीलादेखील अडचणी आल्या. या संदर्भात साखर उद्योगातील तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी सांगितले, की यंदा उसाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे अनेक कारखाने लवकर बंद झाले. परिणामी, मोलॅसिसचे उत्पादनदेखील कमी झाले. इथेनॉलनिर्मितीसाठी मोलॅसिसची आवश्यकता असते. पूर्वी मोलॅसिस म्हणजे एक टाकाऊ पदार्थ, असेच म्हटले जायचे. त्याचा वापर पूर्वी औषधे, रंगनिर्मिती, अल्कोहोल तयार करणे यासाठी केला जाई. दरदेखील कमी होते. आता इथेनॉलची निर्मिती होत असल्यामुळे यालादेखील मागणी वाढली. अनेक कारखान्यांनी इथेनॉलची नोंदणी केली; परंतु गाळप घटल्याने इथेनॉलचे उत्पादनच करता आले नाही. कारखान्यांना आणि पेट्रोलियम कंपन्यांना परवडेल, असा दुवा साधण्यासाठी सरकारने धरसोड वृत्ती बंद केली पाहिजे. तरच, इथेनॉलनिर्मितीचा उद्देश सफल होईल, असे त्यांनी सांगितले. तर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले, की इथेनॉल खरेदीचा निर्णय उशिरा झाला. कारखाने सुरू असतानाच तो निर्णय झाल्यास फरक पडतो. कारखाने सुरू असताना उपलब्ध होणारी वाफ इथेनॉलनिर्मितीसाठी उपयुक्त ठरते. मोलॅसिसच्या दरातदेखील वाढ झाल्याने इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनात घट होण्याची शक्यता... भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर डिसेंबर २०१४मध्ये इथेनॉलखरेदी सुरू केली होती. त्याआधी २००६ पासून ही खरेदी बंद होती. इथेनॉलखरेदीची किंमत कर आणि वाहतूक खर्चासह ४८.५० रुपये ते ४९.५० रुपयांदरम्यान राहील, असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे इथेनॉलचा पुरवठा वाढला. २०१४-१५मध्ये इथेनॉल पुरवठा ६७.४ कोटी लिटरनी वाढला. २०१५-१६च्या इथेनॉल वर्षासाठी १२० कोटी लिटरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यंदा मात्र उत्पादन घटले आहे. त्यातच अबकारी कर कारखान्यांकडून वसूल केला जाणार आहे. >युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत मागेच... अबकारी कर कारखान्यांच्या माथी...पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून वाढणाऱ्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना होत आहेत; परंतु पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेला दर इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना परवडत नाही. युरोपीय राष्ट्रांप्रमाणेच भारतात २५ टक्के इथेनॉल पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये मिश्रण करण्याची मागणी आहे; परंतु सध्या १० टक्केदेखील मिश्रण केले जात नाही. पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये इथेनॉलचे मागणीप्रमाणे मिश्रण केल्यास क्रूड आॅईलच्या आयातीवर होणाऱ्या खर्चात कपात होईल. परंतु, इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या ब्राझील, स्वीडन यासारख्या देशांच्या स्पर्धेत भारत मागे आहे. ब्राझीलमध्ये तर ४० टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरले जाते. मात्र, भारतात त्याचे प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे, देशात सर्वाधिक इथेनॉलनिर्मिती करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. वास्तविक, इथेनॉल पेट्रोलियमजन्य पदार्थामध्ये दर वर्षी ५ टक्के प्रमाणे मिश्रण करावे, असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. आजअखेर २५ टक्क्यांपर्यंत हा निर्णय झाला असता. त्यामुळे क्रूड तेल आयातीवरील खर्च कमी झाला असता. सध्या सतत वाढत असलेल्या पेट्रोलियम पदार्थांचे दर आटोक्यात ठेवण्यात यश आले असते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशांतर्गत इथेनॉलचे दर कमी आहेत. ३९ रुपये प्रमाणे पेट्रोलियम कंपन्या इथेनॉल खरेदी करतात. पूर्वी हा दर ४५ रुपये होता. वरचा ५ रुपये अबकारी कर शासन सहन करीत होते. आता अबकारी कर कारखान्यांनीच भरायचा आहे.