शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विरेंद्र तावडेंवरील आरोप निश्चिती करा

By admin | Updated: October 21, 2016 22:48 IST

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या डॉ. विरेंद्रसिंह तावडेंवरील आरोप निश्चिती करण्याची मागणी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २१ : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या डॉ. विरेंद्रसिंह तावडेंवरील आरोप निश्चिती करण्याची मागणी अ‍ॅड. संजीव पुनाळेकरांनी केली आहे. याबाबतचा अर्ज न्यायालयामध्ये सादर करण्यात आला असून तावडेविरुद्ध सप्टेबर महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सुरू असून पुढील सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 20 आॅगस्ट 2013 रोजी हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जेव्हा दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी आसपासच्या परिसरात साफसफाईचे काम करणा-या सहा कर्मचा-यांची साक्ष घेण्यात आली होती. या साक्षिदारांनी गोळीबाराचा आवाज ऐकला होता तसेच आरोपींना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन जाताना पाहिल्याचेही सांगितले होते. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तूलाचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविण्यात आला असून तो आल्यानंतर तपास करायचा आहे. फरार आरोपी व तावडे यांच्या मोटारसायकलींचा तपास करायचा असल्याचे सीबीआयने या आरोपपत्रात नमूद केलेले आहे.

बॅलेस्टीकचा अहवाल परदेशातून येण्याची वाट पाहिल्यास खटल्याचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने तावडेवरील आरोप निश्चित करा अन्यथा खटल्यामधून सोडा अशी मागणी अर्जाद्वारे केल्याची माहिती अ‍ॅड. संजीव पुनावळे यांनी दिली. आरोपपत्रासोबत सादर करण्यात आलेल्या टिपणांमध्ये विविध साक्षीदारांच्या साक्षी, पुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेली संशयितांची छायाचित्रे, रेखाचित्रे, वीरेंद्रसिंह तावडे याच्या घरी आणि सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची कात्रणे, डॉ. दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे यांचा समावेश आहे.