शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात गतवर्षीच्या तुलनेत आजारांत घट

By admin | Updated: August 3, 2016 05:42 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजारांचे प्रमाण कमीच असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले

मुंबई : पावसाळ्यात शहरात आजार वाढले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजारांचे प्रमाण कमीच असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात विषाणूजन्य तापाचे रुग्ण वाढतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत २३७ने घट झालेली आहे. जुलै २०१६मध्ये मलेरियाचे ५८३ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. महिन्याभरात ६३ रुग्ण आढळून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईत स्वाईन फ्लूने डोके वर काढले होते. स्वाईन फ्लूची साथ गेल्या वर्षीही मुंबईत होती. पण यंदा एकच रुग्ण आढळला आहे. काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, जुलैमध्ये १३५ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी) >एडिस डासाची वैशिष्ट्ये : डेंग्यूची लागण ही एडिस डासाच्या मादीमुळे होते. या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात म्हणून या डासांना ‘टायगर मॉस्क्युटो’ असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. त्यामुळे या डासाचा धोका फक्त घरातच नाही, तर शाळा, कॉलेज, कार्यालय, हॉटेल्स, मॉल, स्टेशन अशा सर्व ठिकाणी आहे. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामध्ये पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास, अळ्या असलेली भांंडी घासून-पुसून स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे भांड्यांच्या पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील. >अशी घ्या काळजी पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो, त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.अति जोखमीच्या व्यक्तींनी (उदा : शेतात काम करणारे, जनावरांची देखभाल करणारे, सफाई कामगार) काळजी घेणे आवश्यक आहे. पायाला जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे. किंवा गमबुटांचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालत आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. उंदीर-घुशींचा नायनाट करावा.उंदीर नियंत्रणासाठी स्वच्छता, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग वापरात आणावेत. घरात आणि आजूबाजूला कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी, कचऱ्याची विल्हेवाट लावावी. ट्रेकिंग टाळावे.