शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

राणेंविरुद्ध ५ कोटींचा दावा करणार - दीपक केसरकर

By admin | Updated: July 21, 2014 02:51 IST

कोकणातील जनता आता पाठीशी उभी राहत नसल्याने काँग्रेस नेते व उद्योगमंत्री नारायण राणे सध्या बिथरले असून माझी व माझ्या कुटुंबियांची बदनामी चालविली आहे.

मुंबई : कोकणातील जनता आता पाठीशी उभी राहत नसल्याने काँग्रेस नेते व उद्योगमंत्री नारायण राणे सध्या बिथरले असून माझी व माझ्या कुटुंबियांची बदनामी चालविली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राणे यांनी ही बेताल वक्तव्ये थांबवावीत अन्यथा त्यांचे काळे धंदे जनतेसमोर उघड करावी लागतील, असा सूचक इशाराही केसरकरांनी दिला.राणे यांची भाषा घसरत चालली असून ते गुंडगिरीची भाषा वापरत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंनी दहशतीच्या जोरावर इतरांना संपविण्याचा प्रयत्न केला, पण तेच संपले. त्यांच्यामागे कुणी राहिलेलेच नाही, त्यामुळेच त्यांना माझी भीती वाटते आणि त्यातूनच माझ्यावर आरोप करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.आज राणे मंत्रीपद सोडताहेत उद्या ते विधानसभेत दिसणार नाहीत, याची काळजी कोकणातील जनता घेईल. राणेंचे आव्हान मी स्वीकारले असून मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देऊ, असा निर्धार केसरकर यांनी व्यक्त केला.माझ्यावर असंस्कृत आणि कृतघ्नपणाचा आरोप करणाऱ्या राणेंनी आधी आपला इतिहास तपासावा. सुसंस्कृत म्हणविणाऱ्या राणेंना कोकणवासीयांनी का नाकारले, सावंतवाडीतून तब्बल ४२ हजार मतांनी राणेपुत्र पिछाडीवर का, या प्रश्नांचा त्यांनी विचार करावा. राणे पितापुत्रांनी कोकणाला न्याय दिला नाही, तर कोकणच्या विकासाची अडवणूक केली, असा आरोप केसरकर यांनी केला. राणे यांच्याकडून जीवाला धोका आहे. याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे यापूर्वीच तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार केली. राज्याच्या राजकारणातून ही गुन्हेगारी संपायलाच हवी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)