शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत दामले यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर

By admin | Updated: November 23, 2015 02:43 IST

प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

मुंबई : प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ‘कार्टी काळजात घुसली’चा १००वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली. प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी मराठी रंगभूमीची गेली तीन दशके अविरत सेवाकेली आहे. हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय कमी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला, पण कमी वयातही त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी त्यांचीच निवड योग्य असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.हा प्रयोग पाहण्यास हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या आणि पार्श्वगायिका राधा मंगेशकरही उपस्थित होत्या. पुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीदिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी दामले यांनी त्यांच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय टप्पा असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)हा टप्पा गाठेन असे वाटले नव्हते!नाबाद शंभरीविषयी दामले म्हणाले, ‘मी रंगभूमीवरील कारकिर्दीत ११ हजार नाट्यप्रयोगांचा टप्पा पार करेन, असे कधी वाटलेच नव्हते, पण कुटुंबाची साथ, मित्रपरिवाराने दाखवलेला विश्वास आणि रसिकांनी भरभरून दिलेले प्रेम, यामुळे मला हे साध्य करता आले. ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकातील कालिदास कान्हेरे अर्थात कांचनच्या वडिलांची भूमिका हे माझ्यासाठी एक आव्हान होते.’