शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नोटा हद्दपारीचा निर्णय आत्मघातकी - अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 06:00 IST

केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात लढा उभारण्याच्या नावाखाली पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करून आत्मघातकी निर्णय घेतला आहे

नाशिक : केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात लढा उभारण्याच्या नावाखाली पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करून आत्मघातकी निर्णय घेतला आहे. एकीकडे या नोटा बंद करून दोन हजारांची नोट काढून काळा पैसानिर्मितीला पुनर्चालना दिल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी केली.बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईजतर्फे नाशिक विभागातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शाखांच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारी दहावे द्वैवार्षिक अधिवेशन झाले. भारतातील बहुतांश संपत्ती मोजक्या धनाढ्य लोकांच्या हाती असून, सर्वसामान्य माणूस या निर्णयाने भरडला जात असल्याने नोटा बंदीच्या निर्णयाचे मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. नोट बंदीच्या निर्णयानंतर रात्रभर सोन्याची दुकाने उघडी असताना आयकर खात्याकडून मुंबई, दिल्लीसह मोठ्या शहरांत कोठेही छापे टाकून काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. मॉरिशससह परदेशात बहुतांश उद्योजकांनी काळ्या पैशांची गुंतवणूक केली आहे. सरकार या देशांना शून्य टक्के कर या निर्णयानुसार गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देते. त्यामुळे आपल्याच देशातील पैसा बाहेरच्या देशात जाऊन पुन्हा पांढरा करण्याचा घाट घातला जात असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.सरकारने राबविलेली योजना चांगली असली, तरी त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. आयकर खात्यात सुमारे ३० हजार पदे रिक्त असताना हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र सोन्याच्या काळ्या बाजारावर कारवाई करण्याचे आदेश आयकर विभागाला का दिले नाही, असा सवालही अभ्यंकर यांनी केला. (प्रतिनिधी)